शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आता ‘मिस्टर वर्ल्ड’ स्पर्धेत फडकवायचा तिरंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:05 IST

मोठा शरीरसौष्ठवपटू बनण्याचे आपले लक्ष्य होते, ते राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून पूर्ण झाले आहे. आता आपण मिस्टर वर्ल्डची तयारी करीत आहोत. मिस्टर वर्ल्डमध्ये भारताचा तिरंगा फकडवण्याचे आपले स्वप्न असल्याचे मत औरंगाबादचा प्रतिभावान शरीरसौष्ठवपटू विक्रम जाधव याने मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. बलदंड भुजा, भरदार छाती, रुंद पाठ, पट पडलेल्या मांड्या, धारदार पोटऱ्या असणाºया औरंगाबादच्या ५ फूट ७ इंच उंचीच्या विक्रम जाधव याने जम्मू-कश्मीर येथे नुकत्याच झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करीत रौप्यपदक जिंकले आहे. ज्युनिअर गटात राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक जिंकणारा तो औरंगाबादचा पहिला शरीरसौष्ठवपटू ठरला आहे.

ठळक मुद्देविक्रम जाधव : ज्युनिअर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत जिंकले रौप्यपदक

औरंगाबाद : मोठा शरीरसौष्ठवपटू बनण्याचे आपले लक्ष्य होते, ते राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून पूर्ण झाले आहे. आता आपण मिस्टर वर्ल्डची तयारी करीत आहोत. मिस्टर वर्ल्डमध्ये भारताचा तिरंगा फकडवण्याचे आपले स्वप्न असल्याचे मत औरंगाबादचा प्रतिभावान शरीरसौष्ठवपटू विक्रम जाधव याने मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.बलदंड भुजा, भरदार छाती, रुंद पाठ, पट पडलेल्या मांड्या, धारदार पोटऱ्या असणाºया औरंगाबादच्या ५ फूट ७ इंच उंचीच्या विक्रम जाधव याने जम्मू-कश्मीर येथे नुकत्याच झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करीत रौप्यपदक जिंकले आहे. ज्युनिअर गटात राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक जिंकणारा तो औरंगाबादचा पहिला शरीरसौष्ठवपटू ठरला आहे. याआधी सिद्धांत मोरे याने राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत कास्यपदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे सिद्धांत मोरे याने जपान येथे अवघ्या १९ व्या वर्षी सिनिअर मिस्टर एशिया शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाºया ५ फूट ७ इंच उंचीचा बलदंड शरीरसौष्ठपटू विक्रम जाधव याने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.दर्जेदार शरीरसौष्ठवपटूसाठी महिन्याला ५0 हजार ते एक लाख रुपये लागतात, असे सांगताना तो म्हणाला, ‘माझा दररोजचा आहार तीस अंडे, एक किलो चिकन, अर्धा किलो फिश, पालेभाज्या, तीन वेळ जेवण असे आहे. अंडे व चिकन हे उकळलेले असते. दररोज सहा ते आठ तास आपण व्यायाम करतो. त्यात ५०० जोर, २०० ते २५० किलो उचलून बैठका मारणे, १५० किलो वजनासह बेंच प्रेसचा व्यायाम, दररोज आठ कि.मी. ट्रेडमिलवर रनिंग करणे, असा माझा दिनक्रम असतो.’आता मात्र, स्वत:च्या कमाईवर विक्रम हा आपल्या शरीरसौष्ठवाचा छंद जोपासत आहे. तो म्हणाला, ‘आता मी देश-परदेशातील लोकांना आॅनलाईनद्वारे शरीरसौष्ठवात्वाचे ट्रेनिंग देत आहे. हाच पैसा मी माझ्या छंदासाठी उपयोगात आणत आहे. व्हीजेआर्मी हा ग्रुप मी स्थापन केला आहे. या ग्रुपतर्फे मिळालेल्या उत्पन्नातून ६० टक्के मी गरजू लोकांना दिवसांतून एक वेळा जेवण देऊन खर्च करतो.’ संजय मोरे, राजू वरकड, माजी मिस्टर वर्ल्डचा मानकरी जगदीश लाड, अभिजित वारे, नीलेश काळे हे माझे मेन्टॉर असल्याचेही त्याने शेवटी सांगितले.आर्थिक परिस्थिती प्रतिकूलआंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू बनण्याचे स्वप्न बाळगत मी ६ वर्षांपासून व्यायामाकडे वळालो. त्यादृष्टीने जम्मू-काश्मीर येथील राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून एक पाऊल मी पुढे टाकले आहे.आता मिस्टर वर्ल्डची तयारी करीत आहे. मिस्टर वर्ल्डमध्ये भारताचा तिरंगा फडकावण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले आहे, असे विक्रम जाधव म्हणतो. विक्रमचा बॉडीबिल्डिंगकडे वळण्याचा मार्ग तसा खडतरच गेला.तो म्हणाला, वडील राजेंद्र जाधव हे व्यायाम करायचे. त्यांचे पाहून मलाही व्यायामाची आवड निर्माण झाली. सुरुवातीला घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होती. खुराकासाठी व जीमची फी भरण्यासाठी पैसे नसायचे. शरीरसौष्ठवचा छंद जोपासण्यासाठी स्वत:ची टू-व्हीलरही विकली.माझ्या यशात आई लता जाधव यांची भूमिका खूप मोलाची आहे. माझ्यासाठी आईने तिचे सोनेही विकले, असे विक्रम सांगतो.