शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाºयांचे आता जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:52 IST

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आता जेलभरो आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आता जेलभरो आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली़अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची स्थिती बिकट झाली आहे़ जिल्ह्यातील बहुतांश उघड्यावर भरणाºया अंगणवाड्यांमध्ये शिकविण्यासाठी अंगणवाडीताई नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़जिल्ह्यात ठिकठिकाणी ६०० अंगणवाड्यांसाठी ६ लाख रूपये खर्चून स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येणार असले तरी बांधकामांना सुरूवात झाली नाही़ त्यामुळे अनेक ठिकाणी अंगणवाड्या उघड्यावर, देवालय, समाजमंदिर, खाजगी इमारतीत भरविल्या जातात़ त्यातच अंगणवाडी कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे नवीन प्रश्नाची भर पडली आहे़पायाभूत शिक्षण दर्जेदार देण्यासाठी अंगणवाड्यांचे स्वरूप बदलण्याच्या घोषणा होतात, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही़ आजही वस्ती, वाडे, तांडे, ग्रामीण भागात गोरगरिबांची मुले उघड्यावर अक्षरे गिरवताना दिसत आहेत़काही गावांत समाजमंदिर, मंदिरात या अंगणवाड्या भरविण्यात येत आहेत़ तसेच काही ठिकाणी खाजगी इमारत भाड्याने घेवून अंगणवाड्या चालविण्यात येत आहेत, परंतु या खाजगी इमारतीचे भाडे अनेक महिन्यांपासून रखडले आहे़ त्यामुळे अंगणवाड्यांची स्थिती नाजूक झाली आहे़ दरम्यान, संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ वेळेवर पुरक आहार मिळत नसल्याने राज्यातील बालके दगावत आहेत़ यासंदर्भात कृती समितीचे जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, संपाचा पुढील टप्पा म्हणून परभणी येथे गुरूवारी जेलभरो अांदोलन करण्यात येत आहे़ याच दिवशी मुंबईत मुख्यमंत्री आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत़ त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे़ अन्यथा आंदोलन यापुढेही सुरुच ठेवण्यात येईल़अंगणवाडीतील बालकांना पुरविण्यात येणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी पर्यायी आहार देण्याची मागणी केली आहे़ महाराष्ट्र राज्यात विशेषत: आदिवासी विभागात बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना टीएचआर दिला जातो. तो अत्यंत निकृष्ट असतो.