शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

आता ९१ लाखाऐवजी ९८ लाखांचा निधी मिळणार

By admin | Updated: August 11, 2014 00:03 IST

जालना: भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील पाणीपुरवठा योजनेसाठी तयार केलेल्या ढोबळ अंदाज पत्रकास शासनाने प्रशासकीस मान्यता दिली आहे.

जालना: भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील पाणीपुरवठा योजनेसाठी तयार केलेल्या ढोबळ अंदाज पत्रकास शासनाने प्रशासकीस मान्यता दिली आहे. दरम्यान यापूर्वी ९१ लाख ८३ हजार ३०० रूपयाची मान्यता देण्यात आली होती. आता त्यात वाढ करून ९८ लाख ८६ हजार दोनशे रूपयाच्या अंदाज पत्रकास मान्यता देण्यात आली आहे.भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील पाणी प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने २६ जानेवारी २०१२ रोजी ठराव घेवून पाणीपुरवठा योजनेबाबत प्रस्ताव दाखल केला होता. दरडोई खर्च वाढल्यामुळे जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला होता. दोन वर्षानंतर म्हणजे २५ जुलै रोजी शासनाने एका निर्णयानुसार या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यावेळी वाढीव दरडोई खर्च ३४२४ असल्याने शासनाने ९१ लाख ८३ हजार ३०० रूपयाच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता दिली होती.आता ६ आॅगस्ट २०१४ रोजी शुद्धी पत्रक काढून ९१ लाखा ऐवजी ९८ लाख ८६ हजार २०० रूपयाच्या ढोबळ अंदाजपत्रकास मान्यता दिली. (प्रतिनिधी)ग्रामसभेत माहिती देण्याची सूचनाशासनाने योजनेचे काम सुरू करण्या संदर्भात १२ सूचना केल्या आहेत. त्यात लोकवर्गणी भरणे बाबत ठराव घेणे, देखभाल दुरूस्तीच्या खर्चासाठी पाणी पट्टीचे दर प्रती घर कमीत कमी ९०० रूपये आकारणे, योजनेमार्फत १०० टक्के घरगुती नळजोडणीचा समावेश करण्यात यावा, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेवून योजनेची माहिती स्पष्टपणे द्यावी आदी मुद्यांचा समावेश आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनाबाभूळगावाला मंजूर झालेल्या या योजनेवरील खर्च जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजेल कार्यक्रमातंर्गत केंद्र तथा राज्य शासनाच्या निधीतून भागविण्यात येणार आहे. योजनेस आता पूर्वी मंजूर केलेल्या ९१ लाख ८३ हजार रूपया ऐवजी ९८ लाख ८६ हजार २०० रूपयाचा निधी मिळणार आहे. निधीत वाढ झाल्याने योजनेचे काम तात्काळ हाती घेवून मार्गी लावावे अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहे.