शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आता सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांचे घरीच विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 13:22 IST

सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांना होम क्वारंटाईन करण्यावर प्रशासकीय यंत्रणेचे एकमत

ठळक मुद्देसुविधा असणाऱ्या रुग्णांना घरीच विलगीकरण होण्याचा पर्याय उपलब्धप्रशासनावरील वाढलेला ताण कमी होण्यास मदत

औरंगाबाद : नागपूर, अमरावती, पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्यातही ज्या कोरोनाबाधित रुग्णांची मोठी घरे किंवा स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलगीकरण (होम क्वारंटाईन) होता येणार आहे. पुढील सोमवारपासून हा निर्णय लागू होणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी दिली. होम क्वारंटाईन करण्याबाबत आजवर प्रशासनात समन्वयाचा अभाव होता. होम क्वारंटाईनचा निर्णय लवकर न घेतल्यामुळे संस्थात्मक अलगीकरण केलेल्या नागरिकांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत कोरोना परिस्थितीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, आ. अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, ज्या घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे  असतील त्यांची स्वतंत्र मोठी घरे आहेत, तसेच ग्रामीण भागातही ज्यांच्या शेतात स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा सर्व कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलगीकरण होण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे प्रशासनावरील वाढलेला ताण कमी होण्यास मदत होईलच, शिवाय रुग्णांना सोयीचे होणार आहे. 

लोकप्रतिनिधींच्या सूचना अशा - खा. कराड म्हणाले, कोविड केअर सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या दररोज भेटी देण्यावर भर द्यावा. - खा. जलील म्हणाले, घाटी रुग्णालयामध्ये मनुष्यबळाचा अभाव दिसून येत असून, तात्काळ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी. - आ. बागडे यांनी कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जाण्यास त्रास होत असून, आंबेडकर चौक ते पिसादेवी हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली. - आ. दानवे म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.  - आ. सावे म्हणाले, वाळूज येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील कामगारांची अँटिजन टेस्टची संख्या वाढविण्यात यावी. - आ. जैस्वाल यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची व हर्सूल तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची मागणी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद