शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

आता शेतक-यांसाठी किसान शिखर मंच करणार आंदोलन

By admin | Updated: June 16, 2017 22:11 IST

शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या विचारात शेतक-यांच्या प्रश्नांवर मागील ३० वर्षांत आंदोलन केलेल्या शेतकरी संघटनेच्या

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 16 -  शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या विचारात शेतक-यांच्या प्रश्नांवर मागील ३० वर्षांत आंदोलन केलेल्या शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक सुभेदारी विश्रामगृहात शुक्रवारी पार झाली. या बैठकीत शेतक-यांचा लढा अधिक प्रखर करण्यासाठी सर्वानुमते किसान शिखर मंचाची स्थापना करण्यात आली आहे.राज्यात शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी शेतकरी नेत्यांची बैठक माजी आमदार शंकर धोंडगे यांनी बोलावली होती. या बैठकीत अनेकांनी नुकत्याच झालेल्या शेतकरी संपाबाबत सुकाणू समिती आणि सरकार यांच्यातील सरसकट कर्जमाफी व इतर मागण्याबाबत झालेल्या निर्णयावर आक्षेप घेतला. सरकारकडून शेतक-यांची फसवणूक होत असल्याची भावनाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे आगामी काळात शेतक-यांचा लढा अधिक परिणामकारक करण्यासाठी विभागवार मेळावे आणि मुख्यमंत्र्यांशी भेटून सविस्तर निवेदन देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. संपूर्ण कर्जमाफीची घोषणा फसवी असून, प्रत्यक्षात लाभ मिळण्यास उशीर लागणार असल्याचेही अनेकांनी सांगितले. यामुळे आगामी काळात एक नव्या आंदोलनाची घोषणा करून कोणत्याही परिस्थितीत शेतक-यांच्या पदरी कर्जमुक्तीसह इतर मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. याविषयी निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीला ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, माजी विधानसभा उपसभापती मोरेश्वर टेंभुर्डे, माजी आमदार सरोजाताई काशीकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनील धनवट, डॉ. गिरिधर पाटील, माजी अध्यक्ष किशोर माधकर, सुरेखाताई ठाकरे, ललीत बहाळे, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, वामनराव जाधव, डॉ. मानवेंद्र काचोळे, गोविंद जोशी, कॉ. अण्णासाहेब कदम, गजानन अहमदाबादकर, बद्रीनाथ देवकर, समाधान कृपाळे, पुंडलिकराव उकिर्डे, दत्ता पवार, संतोष देशमुख, अ‍ॅड. प्रकाश पाटील, संजय कोल्हे, संजय सोळंके, बाबूराव गोल्डे, सीमा नरवडे, जयश्री पाटील, हसन देशमुख, लक्ष्मणराव वगे, गणपतराव हंगरगेकर, मनोज तायडे आदी उपस्थित होते.