लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या व्यापारी संकुलात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या ३०० व्यापाºयांची दुकाने सील करण्याची कारवाई गुरुवार १० आॅगस्टपासून करणार आहे. त्यापूर्वी सर्व व्यापाºयांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. उद्या सोमवार ७ आॅगस्ट रोजी नोटिसा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली. मनपाला चुना लावणाºया व्यापाºयांवर कोणती कारवाई केली याचा अहवाल प्रशासनाला २१ आॅगस्ट रोजी खंडपीठात सादर करावा लागणार आहे.औरंगाबाद खंडपीठाने २००८ मध्ये मनपाच्या गाळ्यांसंदर्भात एक सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. याचिका क्रमांक- ६९८९ मध्ये वेळोवेळी सुनावण्या झाल्या. ४ जुलै २०१७ रोजी न्या. एस. सी. धर्माधिकारी, न्या. मंगेश पाटील यांच्या पीठाने आदेश दिले की, डिफॉल्टर गाळेधारकांवर त्वरित कारवाई करावी. २१ आॅगस्टपर्यंत कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करावा. या आदेशामुळे मनपाचा मालमत्ता विभाग खडबडून जागा झाला आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून जुने करार, फायली शोधण्याचे काम सुरू होते.
३०० व्यापाºयांना आज नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:16 IST