मांडवा: प्रत्येक तलावातील पाणी आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले होते. मात्र परळी तालुक्यातील अनेक तलावांमधील आरक्षित पाण्याचा सर्रास उपसा केला जात असल्याची माहिती ‘लोकमत’ने समोर आणली होती. याची दखल घेत आरक्षित पाण्याचा उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. ‘आरक्षित पाण्याचा उपसा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे यावर्षी भीषण पाणी टंचाई जाणवेल, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली होती. यासाठी प्रत्येक तलावातील पाणी आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले होते. मात्र परळी तालुक्यातील अनेक तलावांमधील आरक्षित पाण्याचा सर्रास उपसा केला जात असल्याची माहिती समोर आणली होती. याची दखल घेत प्रशासनाने आरक्षित पाण्याचा उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तलावातील विद्युत पंप काढले असून वीजही बंद केली आहे. नागापूर धरणातील व बोरणा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात आरक्षित पाण्याचा उपसा केला जात होता. आता पाणी उपसा बंद झाल्याने परिसरात पाणी टंचाई भासणार नाही. (वार्ताहर)
आरक्षित पाण्याचा उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटिसा
By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST