शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: December 27, 2014 00:46 IST

औरंगाबाद : कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष भत्ता दिला जातो. जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियंत्रण ठेवण्यात येते. स्वतंत्र यंत्रणाही कार्यरत आहे.

औरंगाबाद : कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष भत्ता दिला जातो. जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियंत्रण ठेवण्यात येते. स्वतंत्र यंत्रणाही कार्यरत आहे. असे असूनही ग्रामीण आरोग्य सेवेकडे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी केवळ नोकरी म्हणून पाहत असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसले. निम्म्याहून अधिक वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाच्या ठिकाणी मुक्कामी राहतच नाहीत. एवढेच नव्हे तर दुपारनंतर वैद्यकीय अधिकारी गायब होत असल्याने रुग्णांना प्रथमोपचारापासून वंचित राहावे लागत असल्याचे स्पष्ट झाले. अनेक अधिकारी अधिकृत रजा न टाकता आठवड्यातून तीन दिवस गैरहजर राहतात. परिणामी आरोग्य सेवेचे बारा वाजल्याचे लोकमतने दिलेल्या वृत्तात नमूद केले. या वृत्ताची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. बाविस्कर यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वेळेवर रुग्णालयात येतात अथवा नाही. ते तेथे राहतात किंवा नाही, याबाबतची खबरदारी घेण्याची जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. लोकमतने नमूद केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील ३० वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तीन दिवसांत त्यांना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उत्तरे सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. उत्तरे समाधानकारक नसल्यास पुढील कार्यवाहीची रूपरेषा निश्चित केली जाईल.