शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्यपद रद्द करण्यासाठी बदनापूर महाविद्यालयाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:22 IST

बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचे बेकायदा निलंबन रद्द करण्याचे वारंवार आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर यांचे पद रद्द करण्यासाठी बुधवारी (दि.५) नोटीस पाठविली आहे. या नोटिसीला १० डिसेंबरपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : प्राध्यापकांच्या निलंबना विरोधात प्रशासनाचे ठोस पाऊल

औरंगाबाद : बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचे बेकायदा निलंबन रद्द करण्याचे वारंवार आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर यांचे पद रद्द करण्यासाठी बुधवारी (दि.५) नोटीस पाठविली आहे. या नोटिसीला १० डिसेंबरपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत बामुक्टो संघटनेतर्फे निवडणूक लढविलेले डॉ. शरफोद्दीन शेख यांच्या निवडणूक अर्जावर उपप्राचार्य प्रा. महेश उंडेगावकर यांनी सही केली. यानंतर प्राचार्य डॉ. पाथ्रीकर यांनी महाविद्यालयाचे शिक्के व सही बोगस वापरल्याचा आरोप करून दोघांवर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, तसेच निलंबनही केले. याविरोधात दोघांनी जालना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करून घेत गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल केली. यात न्यायालयाने प्राध्यापकांची बाजू ग्राह्य धरून गुन्हे रद्द केले. यानंतरही महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापकांना रुजू करून घेतले नाही. संस्थेने डॉ. एम.डी. जहागीरदार यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली. ही समिती नियमबाह्य असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने समिती रद्द केली. याच कालावधीत उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक आणि विद्यापीठ प्रशासनाने दोन वेळा आदेश देऊन प्राध्यापकांना रुजू करून घेत संपूर्ण वेतन देण्याचे बजावले, तरीही प्राचार्यांची मनमानी कायम राहिल्यामुळे बामुक्टो संघटनेने प्राचार्यांची विद्यापीठ कायद्यातील कलम १३ (च)नुसार पद मान्यता रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे कुलगुरूंकडे केली. यानुसार विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी (दि.५) प्राचार्यांना नोटीस पाठवली आहे. यात आपले पद रद्द का करण्यात येऊ नये, याचा खुलासा १० डिसेंबरपर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत. यावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर कोणती भूमिका घेतात, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.प्राध्यापकांवर विनाकारण अन्याय होता कामा नये. न्याय्य बाजू असतानाही निलंबन केले जात असेल, आदेश देऊनही रुजू केले जात नसेल, तर त्याविरोधात विद्यापीठ प्रशासन कडक भूमिका घेत प्राध्यापकांना न्याय देईल.- डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू

टॅग्स :collegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठAurangabadऔरंगाबाद