शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी विभागाची विवरणपत्र न भरणाऱ्या ६,६४४ व्यापाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 19:53 IST

विवरणपत्र न भरणाऱ्यांवर होणार एकतर्फी निर्धारणेची कारवाई

ठळक मुद्देव्यापाऱ्यांत चिंतेचे वातावरण

औरंगाबाद : औरंगाबाद विभागात ज्या व्यापाऱ्यांनी वस्तू व सेवाकर (जीएसटी)ची ३ बी विवरणपत्रे भरली नाहीत अशा ६,६४४ व्यापाऱ्यांना जीएसटी विभागाने नोटीस बजावली आहे. आधीच मंदीचा काळ, त्यात जीएसटी विभागाच्या नोटिसा यामुळे व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

जीएसटीएन नंबर घेतलेले; पण ३ बीची विवरणपत्रे दाखल केलेली नाहीत, अशा व्यापाऱ्यांविरोधात जीएसटी विभागाकडून देशभरात धडक मोहीम राबविली जात आहे. औरंगाबाद विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्यांचा समावेश होतो. राज्य जीएसटी विभागांतर्गत ४० हजार व्यापाऱ्यांनी जीएसटीएन नंबर घेतले आहेत. त्यापैकी ६,६४४ व्यापाऱ्यांनी ३ बीची विवरणपत्रे आॅनलाईन दाखल केलीच नाहीत. या व्यापाऱ्यांची यादी रेल्वेस्टेशनसमोरील जीएसटी विभागाला प्राप्त झाली आणि या व्यापाऱ्यांना थेट नोटीस देण्यास सुरुवात झाली. यासाठी जीएसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. ते प्रत्यक्ष व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानावर जाऊन त्यांना नोटीस बजावत आहे. यात शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत विवरणपत्र दाखल करण्याचे नोटीसद्वारे आदेश व्यापाऱ्यांना प्राप्त होत आहेत. जे व्यापारी विवरणपत्रे दाखल करणार नाहीत त्यांचे नोंदणी दाखले रद्द करणे, एकतर्फी निर्धारणेची कारवाई करणे, व्यापाऱ्यांची बँक खाती गोठवणे आदी प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे १ हजार व्यापाऱ्यांनी विवरणपत्रे भरली आहेत. मुदतीत विवरणपत्र न भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

जीएसटीएन नंबर रद्द करीत आहेत व्यापारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीएसटीएन विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानावर आम्ही जेव्हा नोटीस घेऊन जातो. तेव्हा काही जणांची वार्षिक उलाढाल ४० लाखांच्या आत असल्याचे आढळून आले आहे. त्यातील काही जणांनी सांगितले की, आम्ही बँकेकडे कर्ज घेण्यासाठी गेलो असताना आम्हाला जीएसटीएन नंबर काढावे असे सांगितल्यामुळे आम्ही जीएसटीएन नंबर काढला. असे व्यापारी आता जीएसटीएन नंबर रद्द करण्यासाठी जीएसटी विभागात येत आहेत. या व्यापाऱ्यांचे नंबर रद्द झाल्यास  जीएसटीएन नंबरचा आकडा फुगलेला आहे, तो कमी होईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

विलंब शुल्क भरावेच लागेल३ बीची विवरणपत्रे न भरल्यामुळे ज्या व्यापाऱ्यांना जीएसटी विभागाकडून नोटीस आली आहे. त्या व्यापाऱ्यांना दिलेल्या मुदतीत विलंब शुल्कासह विवरणपत्र भरावेच लागणार आहे. त्यातून त्यांची सुटका नाही. जर नोटीसकडे दुर्लक्ष केले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. यामुळे विवरणपत्र भरणे हाच एकमेव पर्याय आहे, तसेच ज्यांची वार्षिक उलाढाल ४० लाखांपेक्षा कमी आहे; पण त्यांनी जीएसटीएन नंबर घेतला व विवरणपत्र भरले नाही, अशांना विलंब शुल्कासह विवरणपत्र भरावेच लागेल. त्यानंतर जीएसटीएन नंबर रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. - सीए रोहन आचलिया, अध्यक्ष, सीए संघटना

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबादTaxकर