शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

श्वान पथकाची उल्लेखनीय कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:02 IST

खून, दरोडा, घरफोडीसारख्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खून, दरोडा, घरफोडीसारख्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावल्याचे समोर आले आहे. या श्वान पथकाला जानेवारीपासून कालपर्यंत तब्बल १०५ कॉल्स प्राप्त झाले आणि प्रत्येक कॉल्सला श्वानांनी तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद देऊन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मदत केली.खून असो अथवा दरोड्यासारखा गंभीर गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी धाव घेतात आणि आरोपीचा माग काढण्यासाठी सर्वप्रथम श्वान पथकाला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतात. ग्रामीण भागात शेतवस्ती, वाडी अथवा तांड्यावर दरोडे पडतात. ज्या ठिकाणी वाहने जाऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी पायी जाऊन दरोडे टाकण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. दरोडेखोर अज्ञात असतात. त्यांना कोणीही पाहिलेले नसते. अशावेळी ते कोठून आले अथवा कोणत्या दिशेने पळाले, याबाबतचा अचूक माग काढून पोलिसांच्या तपासाला दिशा देण्याचे काम पोलिसांच्या श्वान पथकातील गुन्हे शोध श्वान करीत असते. ग्रामीण पोलीस दलात स्वीटी आणि खुशी हे गुन्हे शोध श्वान आहेत. ग्रामीण भागात जानेवारीपासून कालपर्यंत तब्बल १०३ गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी दोन्ही श्वानांना बोलावण्यात आले होते. यासाठी श्वान पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक एम.बी. घुगे, सहायक उपनिरीक्षक नासेर पठाण, जमादार गणेश व्यवहारे , प्रकाश मिसाळ, एस.व्ही.तळेकर हे श्वान हॅण्डलर आहेत.मारेकºयाच्या दारात गेले श्वानउपनिरीक्षक घुगे म्हणाले की, सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे ११ डिसेंबर रोजी एका महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर प्रेत एका शेतातील विहिरीजवळ नेऊन टाकून आरोपी पसार झाले होते. दुसºया दिवशी श्वान पथकाला पाचारण केले. घटनास्थळी आरोपीची सापडलेली चप्पल हुंगल्यानंतर श्वान थेट आरोपीच्या घरापर्यंत गेले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य आरोपींची नावे आणि खुनाचे कारणही सांगितले.व्हीआयपी बंदोबस्तप्रसंगी श्वानाची मदतजगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेटी देण्यासाठी देश-विदेशातील व्हीव्हीआयपी लोक औरंगाबादेत येतात. राजकीय नेत्यांचे दौरेही होतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्बशोधक श्वान पथकाकडून त्यांच्या दौºयापूर्वी तपासणी केली जाते. ग्रामीण पोलीस दलात रेनो आणि गुरुनो ही दोन श्वान बॉॅम्बशोधक आहेत. त्यांचीही उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहे. देशपातळीवरील पोलीस श्वान मेळाव्यात या श्वानांनी पारितोषिके प्राप्त केली आहेत.