शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

शिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 18:34 IST

भाजपच्या आमदारांना बलात्कार, खून, दरोड्यांच्या प्रकरणात अटक केली जात आहे. यामुळे हे शिवशाहीचे नव्हे तर गुंडशाहीचे सरकार असल्याची खरमरीत टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर केली.

ठळक मुद्दे२०१४ मध्ये जनतेला लॉलीपॉप दाखवून सत्ता हस्तगत केली. मात्र, आता मोदी लाट ओसरली भाजपची उलटगिनती सुरू झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

औरंगाबाद : राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, भाजपच्या आमदारांना बलात्कार, खून, दरोड्यांच्या प्रकरणात अटक केली जात आहे. यामुळे हे शिवशाहीचे नव्हे तर गुंडशाहीचे सरकार असल्याची खरमरीत टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर केली. २०१४ मध्ये जनतेला लॉलीपॉप दाखवून सत्ता हस्तगत केली. मात्र, आता मोदी लाट ओसरली असून, भाजपची उलटगिनती सुरू झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील आठ आणि सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन अशा एकूण १२ लोकसभा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृहात घेतला. पहिल्या दिवशी मराठवाडा पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी नगर आणि सोलापूर जिल्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर कडवट टीका केली. 

भाजपचा खरा चेहरा समोर आला

भाजपचे आमदार खून, बलात्कारांच्या आरोपात अटक होत आहेत. समाजातील नामचीन गुंडांना पक्षात आणून भाजपने आमदार, खासदार बनवले असल्यामुळे दुसरे काय घडणार, असा सवालही कदम यांनी केला. भाजपचा खरा चेहरा समाजासमोर उघडा पडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारनेही कधी सुडाचे राजकारण केले नाही. मात्र, त्यास भाजप अपवाद आहे. शिवसेनेतील काही नेत्यांना पदाची, पैशाची लालूच दाखवून फोडण्याचे घाणेरडे राजकारणही भाजपने खेळले आहे. याची किंमत भाजपला चुकवावीच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपचा खरा चेहरा समोर आल्यामुळे जनतेला शिवसेनेकडून सर्वांधिक अपेक्षा आहेत. या आपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि पदाधिकारी रात्रंदिवस मेहनत घेण्यास तयार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे लक्ष विचलित करण्याचा डावशिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजपसोबत एक हजार एक टक्के युती होणार नाही. सध्या भाजपवाले युती होणारच म्हणून शिवसेना पदाधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्याची चाल खेळत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढली तर दोन आकडी संख्याही गाठता येणार नाही. यात शिवसेनेचे कोणतेही नुकसान नाही. संभाव्य लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या नुकसानीमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले. युती होणार नसल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा होईल, हा दावाही चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकार