शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'स्वॅब घेण्यास उशीर, अधिक पैसे आकारणे'; शहरात खाजगी रुग्णालयांचा असहकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 16:45 IST

शहरातील एका खाजगी अनुदानित शाळेतील ५२ वर्षीय शिक्षकाला रेशन दुकानावर ड्यूटीवर होता. त्याठिकाणी काम करीत असतानाच मागील चार-पाच दिवसांपासून ताप, थकवा व मळमळ होऊ लागली.

ठळक मुद्दे आरोग्य विमाअंतर्गत उपचार करण्यास नकार

औरंगाबाद : शहरातील खाजगी दवाखान्यांमध्ये इतर आजारांच्या रुग्णांनाही सहकार्य मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील एक शिक्षक रेशन दुकानावर काम करीत असताना त्रास होऊ लागला, तेव्हा शिक्षक एका नामांकित खाजगी दवाखान्यात गेला. त्याठिकाणी तपासण्यांसाठी भरमसाठ शुल्क घेतले. घरी आल्यानंतर पुन्हा तब्येत बिघडल्यानंतर दुसऱ्या नामांकित खाजगी दवाखान्यात अ‍ॅडमिट केले. त्याठिकाणीही आरोग्य विमाअंतर्गत उपचार करण्यास नकार दिल्याची माहिती शिक्षकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

शहरातील एका खाजगी अनुदानित शाळेतील ५२ वर्षीय शिक्षकाला रेशन दुकानावर जिल्हाधिकारी कार्यालयाने योग्य वाटप होते की नाही हे पाहण्यासाठी ड्यूटी लावली होती. हा शिक्षक रेशन दुकानावर नियमितपणे जात होता. त्याठिकाणी काम करीत असतानाच मागील चार-पाच दिवसांपासून ताप, थकवा व मळमळ होऊ लागली. पूर्वी एक मोठे ऑपरेशन झालेल्या एका नामांकित खाजगी दवाखान्यात तपासण्यासाठी शिक्षक शनिवारी गेले. त्या दवाखान्यात सिटी स्कॅनसह इतर तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांसाठी ३० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च घेण्यात आला. त्यांनी तो दिला. या दवाखान्यातून घरी गेल्यानंतर सायंकाळी पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे अगोदर तपासण्या केलेल्या दवाखान्यात न जाता दुसऱ्या नामांकित दवाखान्यात अ‍ॅडमिट झाले.

शनिवारी सायंकाळी अ‍ॅडमिट झाल्यानंतर डॉक्टरांनी न्यूमोनिया आणि कोविड-१९ ची बाधा झालेली असू शकते, असेही सांगण्यात आले. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत स्वॅब घेण्यात आलेला नव्हता. सोमवारी स्वॅब घेऊन मंगळवारी सकाळी रिपोर्ट येईल, असेही दवाखान्याच्या प्रशासनाने सांगितले. संबंधित शिक्षकाने एका खाजगी कंपनीचा आरोग्य विमा घेतलेला आहे. त्या कंपनीच्या यादीत ते उपचार घेत असलेल्या दवाखान्याचे नाव आहे. तरीही संबंधित दवाखान्याच्या प्रशासनाने आरोग्य विमा अंतर्गत उपचार करण्यास नकार दिला असल्याचेही शिक्षकाने सांगितले. 

मदत करण्याची केली मागणीदहा दिवसांपासून रेशन दुकानावर ड्यूटीवर होतो. ताप, थकवा, मळमळ, भूक न लागणे आदी लक्षणेदिसू लागली. त्यामुळे  पोट, छातीचे सिटीस्कॅन केले. त्यासाठी ३० हजार लागले. आता आणखी किती लागतील हे माहिती नाही. तरी माझ्या बांधवांना विनंती करतो की, सदरील खर्च शासन करील का? याची माहिती घेऊन मदत करा, अशी विनंती संबंधित शिक्षकाने सोशल मीडियात केली आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस