नांदेड: शालेय पोषण आहार कामगारांना कामगार म्हणून नाकारणाऱ्या शोषक दिल्ली सरकारविरूद्ध बेमुदत महापडाव करण्याचा इशारा देत शालेय पोषण आहार कामगारांना कामगार म्हणून मान्यता द्या, अशी मागणी संघटनेचे अखिल भारतीय निमंत्रक कॉ़ आऱ सिंधू यांनी केली़ महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या पहिल्या राज्य अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते़ यावेळी सीपीएमचे जिल्हा सचिव कॉ़ अर्जुन आडे, कॉ़ अण्णा सावंत, कॉ़ विजय गाभणे यांची उपस्थिती होती़ कॉ़ सिंधू म्हणाले, देशात १२ लाख शासकीय शाळांत ११ कोटी विद्यार्थ्यांना जेवण पुरवण्यासाठी २६ लाख कामगार काम करतात़ मध्यान्ह भोजन योजना सुरू राहणे ही जनतेचीच मागणी आहे़ परंतु ज्या पद्धतीने या योजनेकडे व कामगारांकडे पाठ फिरविली, त्यापेक्षा वाईट निर्णय घेत योजना आयोगच गुंडाळण्याचे काम मोदी सरकार करीत आहे़ कामगारांना राबवून तुटपुंजे मानधन देत त्याचे शोषण करणाऱ्या शासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचे आवाहन त्यांनी केले़ प्रास्ताविक कॉ़ किर्तीकुमार बुरांडे तर सूत्रसंचालन सीटूच्या कॉ़ उज्ज्वला पडलवार यांनी केले़ (प्रतिनिधी)
‘पोषण आहार कामगारांना मान्यता द्या’
By admin | Updated: August 31, 2014 00:13 IST