शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

मित्रपक्षाच्या मतदारसंघात ‘नोकझोंक’

By admin | Updated: June 22, 2014 01:02 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद लोकसभेच्या निकालामुळे राजकीय सारिपाटावरील चाली बदलत असून त्यानुसार आपल्या सोंगट्या राजकीय पक्षाकडून हलविल्या जात आहेत.

शांतीलाल गायकवाड , औरंगाबादलोकसभेच्या निकालामुळे राजकीय सारिपाटावरील चाली बदलत असून त्यानुसार आपल्या सोंगट्या राजकीय पक्षाकडून हलविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आघाडी व युतीतील पक्षांनी आपल्या मित्र पक्षाच्या मतदारसंघातही समन्वयक, निरीक्षक नेमणे सुरू केले आहेत. काँग्र्रेसने २८८ मतदारसंघांत समन्वयक नेमले आहेत, तर शिवसेनेने या सर्व मतदारसंघांतून उद्धव ठाकरे यांना फिरविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून भाजपा आपल्या ‘शतप्रतिशत भाजपा’ घोषणेवर ठाम आहे. लोकसभेत मोदी लाटेने भाजपाचे ‘चांगले दिवस’ आणले; परंतु त्यामुळे सर्वच पक्षांनी आपली राजकीय समीकरणे नव्याने मांडणे सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘स्वबळा’ची घोषणा करून राजकीय चर्चेला प्रारंभ केला. तोच काँग्रेसने परवा मुंबईत प्रदेश कार्यकारिणी बोलावून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत समन्वयक नेमले. संघटनात्मक कार्यक्रम, प्रचार व प्रसाराला अधिक गती देण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयक नेमल्याचे काँग्रेसतर्फे सांगितले जात आहे.मुळात आघाडीतील काँग्रेस पक्ष विधानसभेच्या १७४ जागांवर लढतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडे आघाडीत विधानसभेचे ११४ मतदारसंघ आहेत. राष्ट्रवादीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वच जागांवर उमेदवार शोधून ठेवण्याच्या सूचना दिल्याचे स्थानिक पुढारी सांगतात. लोकसभेत भाजपा मोठ्या ताकदीने राज्यात समोर आली. त्यामुळे राज्यात युतीत मोठा भाऊ कोण, यावरून चर्चा झडत आहेत. मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात घटक पक्षांना दिलेल्या स्थानावरून राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचे सूत्र कसे असेल, याची झलक त्यातून दिसते. त्यात भाजपाने प्रारंभीपासून ‘शतप्रतिशत भाजपा’चे ध्येय ठेवलेले आहे. या सुवर्णकाळात भाजपा या ध्येयाच्या दिशेने आक्रमकपणे समोर येण्याच्या हालचाली सुरू आहेत. लोकसभेत दोन जागांपर्यंत पीछेहाट झाल्यामुळे काँग्रेसवर राष्ट्रवादी व २३ जागा जिंकून आपण मोठे दादा आहोत, या भूमिकेत शिरलेला भाजपा शिवसेनेवर कुरघोडी करीत असल्याचे समोर आल्याने काँग्रेस व शिवसेनेने मित्र पक्षाच्या मतदारसंघातही समन्वयक, निरीक्षक नेमून ‘नोकझोंक’ करणे सुरू केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरते आहे. मोठा भाऊ कोण?राज्यात युतीत मोठा भाऊ कोण, यावरून आता घमासान सुरू झाले आहे. भाजपाच्या शतप्रतिशतला शिवसेनेने ‘गाव तेथे शिवसेना व घर तेथे भगवा’, अशी घोषणा देऊन एका अर्थाने इशाराच दिला आहे. सोबतच आगामी २३ जून ते २४ जुलै या काळात शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. आतापर्यंत शिवसेनेने भाजपाच्या मतदारसंघात दखल दिली नव्हती; परंतु या वेळेस भाजपाच्या मतदारसंघातही उद्धव बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याला भाजपा कसे उत्तर देणार, हे भविष्यकाळाच्या पोटात दडलेले रहस्य आहे. आतापर्यंत शिवसेना १७१ व भाजपा ११७ जागा लढत होती. या वेळेस हे चित्र बदलण्याचे भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.