शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

उन्नत भारत अभियानाचे विद्यापीठ बनले नोडल केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उन्नत भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी हिताच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनासाठी विभागीय नोडल केंद्र स्थापन केले आहे. यासाठी विद्यापीठ आणि आयआयटी दिल्ली यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.

ठळक मुद्देराष्ट्रीय सेवा योजना : आयआयटी दिल्ली व विद्यापीठात सामंजस्य करार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उन्नत भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी हिताच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनासाठी विभागीय नोडल केंद्र स्थापन केले आहे. यासाठी विद्यापीठ आणि आयआयटी दिल्ली यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.विद्यापीठाला उन्नत भारत अभियानाचे क्षेत्रीय नोडल केंद्र मंजूर झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. आर. पाटील यांची उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उन्नत भारत अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या अध्यक्षपदी संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर आहेत. तर आयआयटी दिल्ली संस्था हा प्रकल्प राबवत आहे. या अभियानासाठी राज्यातील चार विद्यापीठांची, १२ जिल्ह्यांची आणि ६२६ गावांची निवड केली आहे. या सर्व अभियानाचे नोडल केंद्र औरंगाबादचे विद्यापीठ असणार आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने उन्नत भारत अभियानात सुरुवातीला पाच गावे दत्तक घेतली होती. यामध्ये गेवराई कुबेर, मावसाळा, करोडी, चांदापूर आणि चिंचोली बुद्रुक या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये हे अभियान यशस्वी केल्यामुळे विद्यापीठाला नोडल केंद्र देण्यात आले आहे. तसेच २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ५५ महाविद्यालयांनी अभियानाचा प्रचार-प्रसार केला. त्याची दखल दिल्ली आयआयटीने घेतली असल्याचेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले. या अभियानासाठी लागणारा निधीही विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून रासेयोचे संचालक डॉ. टी. आर. पाटील हे काम पाहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.चौकटगावांमधील या समस्यांचे करणार निवारणउन्नत भारत अभियानामध्ये राज्यातील १२ जिल्ह्यांची निवड केली आहे. या जिल्ह्यांतील ६२६ गावांत अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी १३० शिक्षणसंस्था, महाविद्यालयांची निवड केली आहे. या अभियानात प्रामुख्याने गावातील स्वच्छतागृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज, शेतसंबंधी विविध योजनांची अंमलबजावणी, सिंचन, तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षणाचा प्रचार व प्रसार, आरोग्य सुविधांची उपलब्धी आणि गावातील आवश्यक असलेले कार्य करण्यात येणार असल्याचे डॉ. टी. आर. पाटील यांनी सांगितले.------------

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ