शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी

By संतोष हिरेमठ | Updated: July 12, 2025 13:52 IST

संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगचा असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून राज्यभरात एकच चर्चा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : पैशांसाठी काही अडले असे समजण्याचे काहीच कारण नाही. पैसे देणारे आम्हीच आहोत. 'आजकल हमारा नाम बहुत चल रहा है'. त्यामुळे पैशांची चिंता नाही. एखादी बॅग तुमच्याकडे (अधिष्ठाता )पाठवून देऊ, अशी मिश्कील टिप्पणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली.

शासकीय कर्करोग रुग्णालयात आयोजित मेमोग्राफी यंत्राच्या उद्घाटन समारंभप्रसंगी संजय शिरसाट बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घाटी रुग्णालयातील लहान बांधकामांसाठी निधीची मागणी केली होती. संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगचा असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून राज्यभरात एकच चर्चा सुरू आहे. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिरसाट यांनी बॅगचा उल्लेख करत घाटी रुग्णालयाला निधी दिला, असे सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी मंत्री अतुल सावे शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड आदींची उपस्थिती होती.

ठाकरे सेनेचा शिरसाट यांच्यावर हल्लाउद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ 'एक्स'वर पोस्ट केला आहे. शिरसाट बेडवर बसून मोबाईलवर बोलत असून बेडच्या शेजारी नोटांची बॅग असल्याचा दावा राऊत यांनी केला. आयटी नोटिशीनंतर शिरसाटांचा हा व्हिडीओ माझ्याकडे आला आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. तर आयटीची नोटीस आली तरी शिरसाट ऐटीत फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

टार्गेट करण्याचा प्रयत्न यावर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले की, व्हिडिओत तुम्ही पाहताय ते बेडरूममध्ये मी बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी पैशांची बॅग ठेवायची असती तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही शिरसाट यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv Senaशिवसेनाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर