शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या गुन्ह्यात महेबूब शेख बद्दल पोलिसांचा मोठा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 15:01 IST

Rape Case Aurangabad : २६ डिसेंबर रोजी सिडको पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मेहबूब शेख विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठळक मुद्दे पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी दिली माहिती गुन्ह्याच्या तपासासाठी तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख विरुद्ध सिडको ठाण्यात  दाखल बलात्काराच्या  गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात अद्याप आरोपीविरुद्ध तांत्रिक पुरावा मिळाला नसल्याची, माहिती पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी गुरुवारी  पत्रकारांना दिली.

उपायुक्त म्हणाले की, २६ डिसेंबर रोजी सिडको पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मेहबूब शेख विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यापासून शहरातील वातावरण खराब होऊ लागले. या प्रकरणाचा तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीने केला जात आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. त्यांच्या मदतीसाठी तीन पोलीस अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता हे स्वतः या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत. 

आजपर्यंत झालेल्या तपासामध्ये पीडित महिला आणि आरोपी यांच्या मोबाईलचे एक वर्षापासूनचे  कॉल डिटेल पोलिसांनी तपासले आहे. त्यांच्यात संभाषण झाल्याचे दिसून येत नाही. एवढेच नव्हे तर त्यांचे मोबाईल एकाच टॉवर खाली कधीही आले नसल्याचे त्यांनी नमूद केले. असे असले तरी पोलीस या प्रकरणात चोहोबाजूंनी तपास करीत आहेत. पिडिता आणि आरोपी याच्यात व्हॉट्सॲप कॉलिंग झाली होती का? असे विचारले असता त्यांनी अद्याप माहिती समोर आली नसल्याचे सांगितले. शिवाय  अन्य पुरावे मिळते का याविषयी तपास करीत असल्याचे उपायुक्त यांनी नमूद केले.

अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही तपासात आरोपींविरुद्ध तांत्रिक पुरावा नाही, या तुमच्या विधानाचा  पिडितेवर  काय परिणाम होईल असे विचारले असता उपायुक्त यांनी आम्ही सत्य माहिती सांगितली शिवाय या गुंह्याच्या कोणत्याही अंतिम निष्कर्षाप्रत आम्ही आलो नाही. 

अटक करण्याचा अधिकार तपास अधिकाऱ्यांचा बलात्काराच्या गंभीर गुंह्यातील आरोपीला अटक कधी करणार या प्रश्नाचे उत्तर देतांना उपायुक्त गिऱ्हे म्हणाले की ,कोणत्याही गुंह्यातील आरोपीला अटक करायची अथवा नाही याचा सर्वस्वी अधिकार तपास अधिकाऱ्यांचा असतो. त्यांच्यासमोर सबळ पुरावे आल्यावर ते आरोपीला अटक करण्याविषयी निर्णय घेऊ शकतात.