शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

कोरोनाची लक्षणे नाहीत, पण...; अर्ध्याहून अधिक शहर तापाने फणफणले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 14:48 IST

More than half the city was affected by viral fever एकीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असले तरी, अर्ध्याहून अधिक शहरातील नागरिकांना सुरुवातीला कणकण, नंतर किरकोळ स्वरूपाचा ताप, तर काहींना फक्त सर्दी, अंग दुखणे यासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देकितीही औषध, गोळ्या घेतल्या तरी रुग्णांना अशक्तपणा आणि अंग दुखणे थांबायला तयार नाही.ज्या पद्धतीने रुग्ण येत आहेत, त्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद : शहर आणि परिसरात कोरोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. त्यातच आठ दिवसांपासून अर्ध्याहून अधिक शहराला ताप, अंगदुखी, सर्दी अशा व्हायरल आजाराने ग्रासले आहे. खासगी डॉक्‍टरांकडे लांबलचक रांगा दिसून येत आहेत. कोरोनाच्या भीतीने काही नागरिकांनी रांगा लावून टेस्ट करून घेतली. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे डॉक्टरांनीही आता संसर्गजन्य आजार समजून औषधोपचार सुरू केले आहेत.

१५ मार्च रोजी औरंगाबाद शहरात 'कोरोना' संसर्गाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांनाही आता कोरोनाचे गुणधर्म चांगल्या प्रकारे कळू लागले आहेत. पूर्वी साधा ताप असला तरी कोरोनाची भीती वाटत होती. खासगी डॉक्टर पटकन कोरोना तपासणी करण्याचा सल्ला देत होते. कोरोना तपासणी टाळण्यासाठी अनेकजण दुखणे अंगावर काढत होते. मागील वर्षभराचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आता न घाबरता महापालिकेच्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रांवर रांगा लावून टेस्ट करीत आहेत. दररोज ५ हजार तपासण्या करण्यात येत आहेत. त्यात ७०० ते ८०० नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत.

एकीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असले तरी, अर्ध्याहून अधिक शहरातील नागरिकांना सुरुवातीला कणकण, नंतर किरकोळ स्वरूपाचा ताप, तर काहींना फक्त सर्दी, अंग दुखणे यासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रत्येक खासगी डॉक्टरकडे दिवसभरातून किमान शंभर रुग्ण व्हायरल आजाराचे येत आहेत. डॉक्टर रुग्णांना नेहमीप्रमाणे व्हायरल डिसीज समजून औषधोपचार करीत आहेत. तीन ते चार दिवसानंतरही ताप कमी न झाल्यास, कोरोना तपासणी सुद्धा करण्यात येत आहे. त्यात बहुतांशी नागरिक निगेटिव्ह येत आहेत. कितीही औषध, गोळ्या घेतल्या तरी रुग्णांना अशक्तपणा आणि अंग दुखणे थांबायला तयार नाही. ज्या पद्धतीने रुग्ण येत आहेत, त्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

रुग्णसंख्या प्रचंड वाढलीवातावरणातील बदलामुळे शहरात ताप असलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. डायरिया आणि सर्दीच्या रुग्णांची ही संख्या वाढलेली दिसून येते. तीन ते पाच दिवसांमध्ये ताप कमी न झाल्यास रुग्णांनी पटकन कोरोना टेस्ट करून घ्यावी. काही साथीचे आजारही वाढत आहेत.- संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद