शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांपासून निधीच नाही, कोरोना लाटेचा मुकाबला करायचा कसा

By | Updated: November 26, 2020 04:12 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासन मागील ८ महिन्यांपासून कोरोनामध्ये नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी शासनाकडून आर्थिक साहाय्य मात्र ...

औरंगाबाद : महापालिका प्रशासन मागील ८ महिन्यांपासून कोरोनामध्ये नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी शासनाकडून आर्थिक साहाय्य मात्र पुरेसे मिळत नाही. मार्च महिन्यात कोरोनासाठी १७ कोटी रुपये महापालिकेला देण्यात आले. मागील सात महिन्यांपासून महापालिकेला एक रुपयाही निधी दिलेला नाही. ३२ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करायचा कसा, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी कोरोनासंदर्भात सविस्तर माहिती दिली. प्रशासनाने शहरात तब्बल ३ लाख नागरिकांची कोरोना टेस्ट केली. २६ हजार नागरिक आतापर्यंत बाधित आढळले. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. सीसीसी सेंटरमध्ये उपचार केलेल्या नागरिकांना सर्व सोयी-सुविधा देण्यात आल्या. कोट्यवधी रुपये महापालिकेने आतापर्यंत खर्च केले आहेत. मागील बिल थकीत असल्यामुळे कंत्राटदार दुसऱ्या लाटेसाठी काम करायला तयार नाहीत.

कोट्यवधी रुपयांची बिले थकीत

रुग्णवाहिकांचे तीन कोटी रुपयांचे बिल बाकी आहे. कोविड केअर सेंटर्समधील वीज बिलांचे सुमारे एक कोटीचे बिल प्रलंबित आहे. कोविड केअर सेंटर्स व क्वारंटाईन सेंटर्समधील रुग्णांना जेवण देण्यासाठी नेमलेल्या केटरर्सचे तीन कोटींचे बिल प्रलंबित आहे. अँटिजन कीटस्‌चे सात कोटी रुपये, अन्य वैद्यकीय उपकरणे व औषधींची तीन कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. महापालिकेलादेखील खर्च करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून निधी मिळणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून निधी मिळाला, तर कंत्राटदारांचे पेमेंट करता येईल. विहित नमुन्यात निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

आतापर्यंत फक्त १७ कोटी रुपये प्राप्त

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आतापर्यंत महापालिकेला १२ कोटी रुपये मिळाले आहेत, तर जिल्हा नियोजन समितीकडून ५ कोटी रुपये मिळाले. ३२ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव महापालिकेने दिला आहे. ऑक्सिजन प्लांटसाठी एक कोटी रुपयांची मागणी केली होती, हा निधी इतके दिवस मिळाला नाही; पण आता जिल्हाधिकाऱ्यांनी निधी देण्याची तयारी दाखवली आहे.