नांदेड : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात लवकरच नवीन चार रूग्णालये सुरू होणार असून यासाठी प्रत्येक वार्डात महिला आरोग्य समिती स्थापन करण्यात येणार आहे़ राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान देशभर राबविण्यात येतअसून या योजनेत नांदेडचा समावेश झाला आहे़ शहरातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी महापालिकेने नवीन चार रूग्णालये प्रस्तावित केले होते़ हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आवश्यक मनुष्यबळाची विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे़ या योजनेचा एक भाग म्हणून प्रत्येक वार्डात महिला आरोग्य समितीची स्थापना करण्यात येणार आहे़ गरोदर मातांवर विशेष लक्ष देवून जननी सुरक्षा योजनेतंर्गत मोफत आहार व मोफत रूग्णवाहिका पुरविण्यात येणार आहे़ शहारात सध्या महापालिकेचे दोन मातृसेवा केंद्र व १० प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र सुरू आहेत़ गुरू - त्ता - गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त शहरात नवीन इमारती बांधण्यात आल्या़ त्यापैकी जंगमवाडी येथे बांधण्यात आलेली इमारत लॉयन्स क्लबला तर श्यामनगर येथील इमारत महिला रूग्णालयासाठी देण्यात आली़ शहरात सांगवी, कौठा, जंगमवाडी, शिवाजीनगर, खडकपुरा, अरबगल्ली, करबला, इतवारा, सिडको, तरोडा या ठिकाणी महापालिकेचे रूग्णालये आहेत़ यातील काही रूग्णालये बंद स्थितीत आहेत़ या रूग्णालयांनाही बळ देण्यात येणार आहे़ नवीन रूग्णालयांची स्थापना आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहे़ औषध फवारणी सुरू महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात हिवताप व डेंगू आजारांचा प्रचार टाळण्यासाठी ५ आॅगस्ट पासून प्रभागनिहाय अळीनाशक औषधी फवारणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ संशशित डेंगू रूग्णांचे रक्तजल नमुने तपासणी मनपाच्या जंगमवाडी, शिवाजीनगर, हैदरबाग किंवा इतवारा या रूग्णालयात करण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)
मनपा महिला आरोग्य समिती स्थापन करणार
By admin | Updated: August 10, 2014 02:23 IST