शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

केवळ २०० रुपयांसाठी घेतला नऊ जणांचा बळी

By admin | Updated: June 12, 2017 00:20 IST

बीड : आष्टीत झालेल्या अपघातातील सागर ट्रॅव्हल्सला केवळ ३४ लोक (३० प्रवासी, २ चालक व २ क्लिनर) बसविण्याची परवानगी होती.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आष्टीत झालेल्या अपघातातील सागर ट्रॅव्हल्सला केवळ ३४ लोक (३० प्रवासी, २ चालक व २ क्लिनर) बसविण्याची परवानगी होती. परंतु त्यांनी तब्बल ४० प्रवासी (३७ प्रवासी, २ चालक व १ क्लिनर) बसविल्याचे उघड झाले आहे. जादा बसविलेले प्रवासी हे केबीनमध्ये चालकाच्या बाजूला होते. या प्रवाशांकडून चालक हे १०० ते २०० रुपये घेतात. परंतु याच २०० रूपयांनी रविवारी नऊ जणांचा बळी घेतला. मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यात खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. मनमानी तिकीट दर आकारून प्रवाशांची लूट करण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. एकीकडे राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांसाठी नवनवीन सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु बीड जिल्ह्यात अद्यापही सुविधायुक्त व आरामदायी बसेस दाखल झालेल्या नाहीत. याचाच फायदा घेत ट्रॅव्हल्सवाल्यांची दुकानदारी जोरात सुरू आहे. बीडमध्ये बस्थानक परिसरात तर या ट्रॅव्हल्सवाल्यांनी कार्यालये उघडली आहेत. प्रवाशांना जमविण्यासाठी त्यांचे काही ‘एजंट’ परिसरात फिरत असतात. एवढेच नव्हे तर बसस्थानकातून प्रवासी पळविण्याचे धाडसही हे ‘एजंट’ रापमतील अधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षाने राजरोसपणे करीत आहेत. दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच आहेत.दरम्यान, परवानगीपेक्षाही जादा प्रवासी बसवून अपघाताला निमंत्रण देण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. सीटिंग किंवा स्लीपर बसेसमध्ये सर्रास असे प्रकार घडत आहेत. जे प्रवासी केबिनमध्ये बसतील त्यांच्याकडून केवळ १०० ते २०० रुपये तिकीट म्हणून घेतले जातात. हे पैसे चालक व क्लिनर लोक विभागून घेतात. याच पैशात मग रस्त्यात एखाद्या ढाब्यावर बस उभी करायची आणि जेवण करायचं, असा काहीसा त्यांचा दिनक्रम ठरलेला असतो. परंतु हेच पैसे आपल्यासोबत असणाऱ्या ३० ते ४० प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे असतात, याची जाणीव संबंधित चालकांना नसते. ते आपल्या सवयीप्रमाणे सर्रासपणे असे पैसे वसूल करत असल्याचे समोर आले आहे.रविवारीही बसविलेले जादा प्रवासी केबिनमध्येच होते. बोलण्याच्या नादात किंवा बाजूच्याला आलेली झोप पाहून चालकालाही डुलकी लागली. आणि चालकाचा बसवरील ताबा सुटला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.