शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

निलंगेकरांनीच अडविले नांदेडचे आयुक्तालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:53 IST

त न्यूज नेटवर्क नांदेड : भाजपाचे मनपा प्रभारी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी युती संदर्भात आपल्याशी चर्चा केल्याचे बुधवारी झालेल्या मेळाव्यात सांगितले. मात्र प्रत्यक्षात निलंगेकर यांची माझ्यासोबत या विषयावर कसलीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा आ. हेमंत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भाजपाचे मनपा प्रभारी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी युती संदर्भात आपल्याशी चर्चा केल्याचे बुधवारी झालेल्या मेळाव्यात सांगितले. मात्र प्रत्यक्षात निलंगेकर यांची माझ्यासोबत या विषयावर कसलीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा आ. हेमंत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. याचवेळी त्यांनी भाजपावर टिका करीत, नांदेड महसुल आयुक्यालयाचा प्रश्न न्यायालयात निकाली लागल्यानंतरही सदर कार्यालय लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीच अडविल्याचा घणाघाती आरोपही केला.बुधवारी नांदेडमध्ये भाजपाचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात कामगारमंत्री निलंगेकर यांनी युती संदर्भात शिवसेनेचे स्थानिक नेते आ. हेमंत पाटील यांची भेट घेतल्याचे जाहीरपणे तसेच पत्रकार परिषदेतही सांगितले होते. युती करण्यास भाजपा तयार असून या संदर्भात सेनेच्या वरिष्ठांशी आपण मुंबईमध्ये बोलू असे ते म्हणाले होते. याबाबत सेनेचे आ. पाटील म्हणाले की, निलंगेकर आणि आपली भेट झालीच नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. १२ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये मंत्रालयात लिफ्टमध्ये दोन मिनिटे आम्ही सोबत होतो. तेथेही हा विषय निघाला नसल्याचे ते म्हणाले.दरम्यान, भाजपाचा भर शिवसेनेची फोडाफोडी करण्यावर आहे. त्यानंतरही आम्ही हे विसरुन युतीसाठी इच्छुक आहोत. भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांच्याकडे सिडकोतील सेना कार्यकर्ते युती संदर्भात चर्चा करण्यासाठीही गेले होते, अशी माहिती त्यांनी दिली. महापालिका निवडणुकीत काँग्रेस हाच सेनेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपाच्या प्रचारात सामिल असल्याबाबत विचारले असता, पक्षाचा राजीनामा देवून त्यांनी कुठेही काम करावे. त्यांच्या या कृत्याची शिवसेना पक्षश्रेष्ठी दखल घेतील, असेही ते म्हणाले. नांदेडला महसूल आयुक्तालय व्हावे यासाठी शिवसेनेने वारंवार पाठपुरावा केला आहे. आंदोलनेही केले आहे. इतकेच नव्हे तर १ लाख नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्रही शासनाला पाठवले आहे. मात्र राजकीय विरोधातून हा विषय निलंगेकरांनी अडवला असल्याचा आरोप त्यांनी केला.या निवडणुकीच्या तयारीसाठी सेना सज्ज झाली असून १५ सप्टेंबर रोजी संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. १ ते १० आॅक्टोबर या कालावधीत सेना नेते पर्यावरणमंत्री रामदास हे नांदेडत तळ ठोकून राहणार आहेत. या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, प्रकाश मारावार, पप्पु जाधव, धोंडु पाटील, अशोक उमरेकर, तुलजेश यादव आदींची उपस्थिती होती. बुधवारी झालेल्या मेळाव्यात सेनेचे उपजिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांचाही भाजपा प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. मात्र आपण भाजपात प्रवेश केला नसून शिवसेनेतच निष्ठेने कार्यरत राहणार असल्याचे बडुरे यांनी सांगितले.