औरंगाबाद: परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका एम. एच.- २० एफ. एस. ही सद्यस्थितीत सुरू आहे. या मालिकेतील क्रमांकाचे वाटप संपत आलेले आहे. त्या अनुषंगाने परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी एम. एच. -२० एफ. टी. १ ते ९९९९ ही मालिका ९ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
प्रवेशासाठी ऑनलाईन नावनोंदणी
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रवेशअर्ज ३१ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.