शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात १२८ कोटींतून होणार २९९ कि़मी. रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:54 IST

राष्ट्रीय महामार्ग राज्य विभागाकडून मराठवाड्यात २९९ कि़मी. रस्त्यांची कामे नव्याने होणार असून, त्यासाठी १२८ कोटी रुपयांची तरतूद नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुख्यालयाकडून करण्यात आलेली आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग राज्य विभागाकडून मराठवाड्यात २९९ कि़मी. रस्त्यांची कामे नव्याने होणार असून, त्यासाठी १२८ कोटी रुपयांची तरतूद नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुख्यालयाकडून करण्यात आलेली आहे.विभागातील प्रत्येक जिल्ह्यात ३० ते ४० कि़ मी. दरम्यान ही कामे होणार असून, त्यासाठी १५ ते १६ कोटी रुपयांची तरतूद जिल्हानिहाय करण्यात आलेली आहे. येत्या दोन वर्षांत मराठवाड्यातील २९९ कि़मी.ची कामे काँक्रिटीकरणातून करण्याचा राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मानस आहे. भोकरदन ते हसनाबाद मार्गे जवखेडा ते राजूर मार्गे देऊळगावराजा या ६७ कि़ मी. रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. ३०४ कोटी रुपयांतून होणारे हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा मुख्य अभियंता एल. एस. जोशी यांनी केला.या कामांव्यतिरिक्त येवला ते शिऊर या रस्त्याचे काम १५५ कोटींतून होत आहे. २९ कि़मी.चे ते काम आहे. ए.आर.कन्स्ट्रक्शन्सकडे ते काम देण्यात आले आहे. खुलताबाद ते फुलंब्री मार्गे पाल फाटा हे काम गंगामाई कन्स्ट्रक्शन करीत असून, १५८ कोटी रुपयांच्या खर्चातून ३२ कि़मी.चा रस्ता करण्यात येणार आहे. हासनी दुधार हा २९ कि़मी. चा रस्ता १४५ कोटींतून करण्यात येत असून, गुजरातच्या सरस्वती कन्स्ट्रक्शन्सकडे ते काम देण्यात आले आहे. धाड ते भोकरदन मार्गे सिल्लोड या रस्त्यावर ३२० कोटी खर्च होत असून, ५५ कि़मी.पर्यंत रस्त्याचे काम त्यातून केले जाणार आहे. हे सगळे रस्ते द्विपदरी होणार असून १४ मीटरपर्यंत टॉपविड्थ असून सर्व रस्ते काँक्रिटीकरणातून होणार आहेत. या शिवाय वडीगोद्री ते जालना हा रस्ता २४० कोटींतून करण्यात येणार आहे. ५५ कि़मी.पर्यंत तो रस्ता असणार आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागMarathwadaमराठवाडा