शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेसाठी नवे चेहरे

By admin | Updated: February 5, 2017 23:18 IST

लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान सदस्यांना सर्वच पक्षांनी डावलले असून, सत्ताधारी काँग्रेससह अन्य पक्षांत केवळ १० जणांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.

आशपाक पठाण लातूरजिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान सदस्यांना सर्वच पक्षांनी डावलले असून, सत्ताधारी काँग्रेससह अन्य पक्षांत केवळ १० जणांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. ५८ सदस्य संख्या असलेल्या लातूर जिल्हा परिषदेत अनेक दिग्गजांचे तिकीट कापले गेल्याने त्यांना घरी बसावे लागले आहे. काहींनी पक्षांतर केले, तर काहींनी पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून गप्प बसणेच पसंत केले आहे. विद्यमान अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांना आरक्षणामुळे गट बदलावा लागला आहे. तर भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या गटनेत्यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. ५८ सदस्यांपैकी काँग्रेस ३५, राष्ट्रवादी ९, शिवसेना ५, भाजप ८ व अपक्ष (मनसे) १ अशी सदस्य संख्या आहे. काँग्रेस पक्षाने विद्यमान सदस्यांपैकी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, गटनेते काँग्रेसचे गटनेते दिलीप पाटील नागराळकर, ज्योती पवार या तिघांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विद्यमान सदस्य चंदन पाटील यांनी मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर भाजपात प्रवेश करून त्यांच्या दुसऱ्या गटातून उमेदवारी मिळविली आहे. किल्लारी गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सदस्य ज्योती पाटील यांचाही मतदारसंघ सर्वसाधारण झाल्याने या गटातून त्यांना दुसऱ्यांदा तिकीट मिळणे अवघड झाल्याचे लक्षात येताच त्यांचे पती बंकट पाटील यांनी भाजपात प्रवेश करून किल्लारी गटातून उमेदवारी दाखल केली आहे. मुरुड गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सदस्या जयश्री तवले यांचा गट सर्वसाधारण झाल्याने या गटातून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र पंचायत समितीच्या महिला आरक्षित गणातून त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचे विद्यमान सदस्य चंद्रकांत मद्दे यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. याशिवाय, सरवडी जिल्हा परिषद गटातील भाजपचे विद्यमान सदस्य भीमराव गायकवाड, अंबुलगा गटातील सदस्य डॉ. संजीव बिराजदार यांनी पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता धुसर झाल्याचे लक्षात घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. सध्या दोघेही शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. डॉ. संजीव बिराजदार यांना देवणी तालुक्यातील वलांडी गटातून तर भीमराव गायकवाड यांनी मदनसुरी गटातून उमेदवारी दाखल केली आहे. औसा तालुक्यातील भादा गटातील शिवसेनेच्या विद्यमान सदस्या सविता शिंदे यांचा मतदारसंघ सर्वसाधारण झाल्याने त्यांचे पती सतीश शिंदे शिवसेनेचे उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५८ सदस्यांपैकी केवळ १० जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.