शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नव्या हवाई सेवेने एक दिवसात करता येणार दिल्ली, औरंगाबाद दर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 17:23 IST

देश-विदेशातील पर्यटक, उद्योजकांना नव्या विमानसेवेचा होणार फायदा

ठळक मुद्देविमानाने सकाळी जाऊन सायंकाळी परत  

औरंगाबाद : स्पाईस जेटकडून ८ आॅक्टोबरपासून सकाळच्या वेळेत दररोज औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू केली जाणार आहे. तर सध्या सायंकाळच्या वेळेत एअर इंडियाची दिल्ली-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू आहे. यामुळे एका दिवसात दिल्ली, औरंगाबाद दर्शन करता येईल. म्हणजे दिल्लीला सकाळी जाऊन सायंकाळी विमानाने परत येणे शक्य होणार आहे. याचा देश-विदेशातील पर्यटकांबरोबर लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांना फायदा होणार आहे. 

दिल्लीहून सकाळी ६ वाजता उड्डाण घेतल्यानंतर सकाळी ७.५० वाजता स्पाईस जेटचे विमान औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर औरंगाबादहून सकाळी ८.२० वाजता विमान उड्डाण घेईल आणि सकाळी १०.२० वाजता दिल्लीत दाखल होईल. औरंगाबादहून सध्या एअर इंडियाची मुंबई- औरंगाबाद-दिल्ली आणि  दिल्ली - औरंगाबाद - मुंबई या विमानसेवेने शहर दिल्ली, मुंबई शहराबरोबर हवाई सेवेने जोडलेले आहे. 

विमानाने सकाळी दिल्लीत जाऊन त्याच दिवशी सायंकाळी परत येणे नव्या विमानसेवेमुळे शक्य होणार आहे. या नव्या विमानसेवेचा सर्वाधिक फायदा दिल्लीहून पर्यटनासाठी औरंगाबादला येणाऱ्या पर्यटकांना होणार आहे. सकाळी ८ वाजता औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणीला भेट देऊन सायंकाळी परत जाणे शक्य होणार आहे. ही बाब समोर ठेवून स्पाईस जेटकडून विमानसेवा पर्यटकांसाठी ठेवली जात आहे. औरंगाबादेतील बीबीका मकबरा, दौलताबाद किल्ला, वेरूळचे घृष्णेश्वर मंदिराची माहिती प्रवासी पर्यटकांना दिली जात आहे. स्पाईस जेटच्या विमानसेवेमुळे आॅक्टोबरपासून दिल्लीची हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. विशेष म्हणजे सकाळच्या वेळेत दिल्लीसाठी विमान सुरू होत आहे. त्यामुळे विविध क्षेत्राला ही विमानसेवा फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. 

मुंबईसाठी सकाळचे विमान सुरु व्हावे दिल्लीहून सकाळी औरंगाबादला येऊन वेरूळ, अजिंठ्याला भेट देऊन पुन्हा सायंकाळी दिल्लीला जाणे पर्यटकांना शक्य होईल. औरंगाबादहून दिल्लीला गेल्यानंतर त्याच दिवशी दिल्लीहून विमानाने परत येता येईल. परंतु दिल्लीत काही मोजकेच तास थांबता येईल. सध्या अनेक जण मुंबईमार्गे औरंगाबादला येतात. त्यामुळे मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमान सुरू होणे गरजेचे आहे.- आशुतोष बडवे, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन आॅफ औरंगाबाद  

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनbusinessव्यवसायAurangabadऔरंगाबाद