शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या सुभेदारीत ‘व्हीव्हीआयपी’ सूटस्ची उभी राहणार नवी इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:59 IST

सुभेदारी विश्रामगृह परिसरातील अ‍ॅनेक्स या व्हीआयपी कक्षालगत असलेल्या जागेत ६ कोटी रुपये खर्चातून ‘व्हीव्हीआयपी’ सूटस् असलेली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. पर्यावरण मैत्रभाव (इको फ्रेंडली) ग्रीनफिल्डच्या धर्तीवर ती इमारत बांधण्यात येणार असून, पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या इमारतीप्रमाणेच येथील इमारत बांधण्यात येणार आहे. बांधकाम विभागाने यासाठी आराखडा तयार केला असून, जिल्हा नियोजन समितीतून या कामासाठी निधी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देइको फे्रंडली बांधकाम : ६ कोटी रुपयांचा खर्च, आराखडा तयार; जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सुभेदारी विश्रामगृह परिसरातील अ‍ॅनेक्स या व्हीआयपी कक्षालगत असलेल्या जागेत ६ कोटी रुपये खर्चातून ‘व्हीव्हीआयपी’ सूटस् असलेली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. पर्यावरण मैत्रभाव (इको फ्रेंडली) ग्रीनफिल्डच्या धर्तीवर ती इमारत बांधण्यात येणार असून, पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या इमारतीप्रमाणेच येथील इमारत बांधण्यात येणार आहे. बांधकाम विभागाने यासाठी आराखडा तयार केला असून, जिल्हा नियोजन समितीतून या कामासाठी निधी देण्यात येणार आहे.या दशकामध्ये शहरात पर्यटक येण्याचे प्रमाण वाढते आहे, तसेच प्रादेशिक पातळीवर शासकीय बैठका होत आहेत. आगामी काळात सर्व शासकीय कार्यालयांचे संकुल लेबर कॉलनी परिसरात बांधण्याचे विभागीय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन आहे. सुभेदारी विश्रामगृहात सध्या असलेली व्यवस्था पुरेशी नाही. सर्व मिळून ४५ सूटस् तेथे आहेत. त्यामुळे चांगल्या सोयीची एक इमारत बांधण्याचा प्रस्ताव गेल्यावर्षी चर्चेला आला. विद्यमान परिसरात सभागृह नाही, त्यामुळे नवीन इमारती सुसज्ज असे सभागृह, पार्किंगची व्यवस्था असणार आहे.अधीक्षक अभियंता म्हणालेबेडरुम्स, किचन, हॉल, गॅलरी अशी किमान टू बीएचकेचा एक सूटस् असणार आहे. कॅबिनेट मंत्री आणि सचिव दर्जाचे अधिकारी व सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ठराविक पर्यटकांना येथे थांबता येईल. इतरांसाठी ते सूटस् उपलब्ध होणार नाहीत.या इमारतीमध्ये मंत्री तथा सचिवांना बैठका घेण्यासाठी मोठा प्रशस्त हॉल (सभागृह) बांधण्यात येणार असून तो हॉल सुविधायुक्त असेल. सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहावी. विजेचा वापर कमी प्रमाणात होईल. तसेच सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणेदेखील या इमारतीत वापरण्याचा विचार सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले.