कंधार : तालुक्यातील अपंग, परित्यक्ता, विधवा आदी पात्र लाभार्थिंना मंजुरीचा प्रश्न रेंगाळला होता़ नुकत्याच एका बैठकीत संजय गांधी निराधार योजनेचे १४०, श्रावण बाळ योजना राज्य निवृत्ती योजनेचे ६२ अर्ज मंजूर करण्यात आले़ निराधारांना आधार मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे़शासन स्तरावरून निराधारांना मदतीचा हात दिला जातो़ निकषात बसत असतानाही ताटकळत बसावे लागते़ त्यामुळे लाभार्थ्यांची फरफट होते़ तातकळ निर्णय घेवून अर्ज निकाली काढल्यास पात्र असणाऱ्या लाभार्थिंना याचा फायदा होतो़ आणि योजनेमुळे मिळणाऱ्या आधाराने मोठा दिलासा मिळतो़ नुकतीच विविध योजनेचे अर्ज मंजुरीसाठी बैठक पार पडली़ समितीचे अध्यक्ष शफीउल्ला बेग, सदस्य चित्राताई लुंगारे, संभाजी केंद्रे, व्यंकट गायकवाड, माधव मुगावे, जयवंत रुंजे, तहसीलदार अरूणा संगेवार, गटविकास अधिकारी ए़एसक़दम, ऩप़ मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, नायब तहसीलदार उत्तम निलावाड आदींच्या उपस्थिीती बैठक पार पडली़ आणि विविध योजनेचे २०२ अर्ज मंजूर करण्यात आले़निराधार योजनेचे अर्ज मंजूर झाल्याने कंधार, गुंटूर, वंजारवाडी, बहाद्दरपुरा, कोटबाजार, दिग्रस बु़, घोडज, गुंडा, बिजेवाडी, दिग्रस खु़, जंगमवाडी, गुलाबवाडी, घागरदरा, अंबुलगा, कंधारेवाडी, उमरज, बाचोटी, इमामवाडी, शिराढोण, भुत्याचीवाडी, दाताळा, चिखलभोसी, बाभूळगाव, तेलंगवाडी, दहीकळंबा, पेठवडज, मानसपुरी, सावरगाव, मंगनाळी, रूई, उस्माननगर, मुंडेवाडी, पानशेवडी, कुरुळा, हाडोळी, उमरगा, हाटक्याळ, हिप्परगा, गुट्टेवाडी, नंदनशिवणी, पोखर्णी, कौठा, नागलगाव, हासूळ, औराळ, हाळदा, तेलूर, मंगलसांगवी, गऊळ, कल्हाळी आदी गावातील लाभार्थ्यांचा समावेश आहे़ अनेक दिवसांपासून रेंगाळलेली निराधारांचा प्रश्न मार्गी लागल्याने लाभार्थ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे़ (वार्ताहर)
कंधारात नवीन २०२ निराधारांना आधार
By admin | Updated: July 31, 2014 00:48 IST