वसमत : मातंग समाजास आठ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वसमत येथे चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. उपोषणादरम्यान अनेक उपोषणार्थींची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना उपचारार्थ रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन चौकशी केली. वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रविकिरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या वतीने उपोषण सुरू आहे. उपोषणार्थींना हमाल-मापाडी संघटना व इतर संघटनांसह महिला समाजबांधवांचा पाठिंबा मिळत आहे. शुक्रवारी उपोषणाचा चौथा दिवस असून, या दिवशी उपोषणार्थी रविकिरण वाघमारे व इतरांची प्रकृती ढासळली. डॉक्टरांनी उपोषणार्थींची तपासणी केली. दुपारी तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन रविकिरण वाघमारे यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांच्या प्रकृतीचीही चौकशी केली. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा निर्धार वाघमारे यांनी केला आहे. (वार्ताहर)
उपोषणार्थीची प्रकृती खालावली
By admin | Updated: August 23, 2014 00:46 IST