शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भल्या मोठ्या क्षेत्रातही नगण्य उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:55 IST

नेहमीच चर्चेत असलेल्या कृषी विभागाच्या बिजाराममध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कमी उत्पन्न दाखविले जाते. या बीजगुणन केंद्रावर शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करते. सर्व सुविधा असतानाही उत्पन्नात घट का व्हावी? याचा अजून तरी ताळमेळ लागलेला नाही. प्रत्येक वेळी विचारणा केली असता कमी उत्पन्न झाल्याचे तेवढे मात्र संबंधित यंत्रणा सांगते.

ठळक मुद्देशासनाचा खर्च पाण्यात : ...म्हणे निसर्गाच्या अवकृपेनेच होेतेय उत्पन्नात घट

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नेहमीच चर्चेत असलेल्या कृषी विभागाच्या बिजाराममध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कमी उत्पन्न दाखविले जाते. या बीजगुणन केंद्रावर शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करते. सर्व सुविधा असतानाही उत्पन्नात घट का व्हावी? याचा अजून तरी ताळमेळ लागलेला नाही. प्रत्येक वेळी विचारणा केली असता कमी उत्पन्न झाल्याचे तेवढे मात्र संबंधित यंत्रणा सांगते.हिंगोलीत बिजारामचे सर्वाधिक क्षेत्र आहे. यामध्ये एकूण पाच तालुका बीज गुणन केंद्र आहेत. यामध्ये बासंबा, औंढा नागनाथ तालुक्यात गोळेगाव, वसमत, कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर या गावांचा समावेश आहे. एकट्या बासंबा येथे ३५.५० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ ३ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य नाही. उर्वरित जमिनीवर सोयाबीन, ज्वारी, मूग, उडिदाची पेरणी केली होती. यावर लाखो रुपयाचा खर्चही करण्यात आला होता. तर सोयाबीन ४० क्विंटलच झाल्याचे सांगण्यात आले. इतर पिकांच्या उत्पन्नाचा तर अजून ताळमेळच नाही. म्हणे, याहीवर्षी अल्प पर्जन्यमानामुळेच उत्पन्न कमी झाल्याची ओरड या विभागातून होत आहे. विशेष म्हणजे याच भागात असलेल्या शेतकºयांना सोयाबीन पिकाचा एकरी पाच ते सहा पोत्यांचा उतारा आलेला आहे. मात्र या यंत्रणेकडे सर्व सुविधासह आधुनिक यंत्रही उपलब्ध असली तरी नेहमीच निसर्गाचे कारण सांगत उत्पन्न कामी सांगण्याचा फंडा लावला आहे. सर्व सुविधा असल्याने तरी या क्षेत्रात उतारा चांगला येणे गरजेचा आहे. निदान शासनाचा भांडवली खर्च तरी भरुन निघण्यास मदत होईल. शिवाय सुरक्षारक्षकही क्षेत्रात उपलब्ध नसल्याने क्षेत्रातील ज्वारी किंवा आदी पिकांची गुरांकडून नुकसान अथवा चोरी केली असली तरीही अद्याप कोणतेच टोकाचे पाऊल न उचलता पायबंद घातलेला नाही. त्याचा फायदा घेऊन बिजाराममधील पिकांचे आतोनात नुकसान केले जात आहे. त्यातच नियुक्ती केलेले सुरक्षारक्षकही कधीतरी या भागात फेरफटका मारत असल्याने त्यांचाही कोणावर वचक राहिलेला नाही. ही स्थिती केवळ बासंबा परिसरातीच नव्हे, तर पाचही ठिकाणच्या केंद्रातील वास्तव चित्र आहे. त्यामुळे परिसरात उत्पन्नाची चांगलीच चर्चा रंगत आहे.