शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

आरोग्य केंद्रातील दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष; दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची पगारवाढ रोखण्याची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 16:47 IST

जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सुमारे सव्वादोनशे उपकेंद्र कार्यरत आहेत.

औरंगाबाद : कोविड प्रतिबंधक लसीकरणासह बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आणि अन्य दैनंदिन कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आणखी १० वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई सुरू झाली आहे.

जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सुमारे सव्वादोनशे उपकेंद्र कार्यरत आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन किंवा तीन वैद्यकीय अधिकारी आणि उपकेंद्रात बीएएमएस पदवीधर समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या २५ ते ३० खेड्यांतील बालकांचे धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प, गोवर, कोविड प्रतिबंधकचे नियमित लसीकरण करणे, अर्भक मृत्यूदर कमी करणे आदी प्रकारची नियमित कामे करावी लागतात. कोविड प्रतिबंधक लसीकरणाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतील १० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजाकडे दुर्लक्ष केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या पाहणीत आढळून आले. एवढेच नव्हे तर लसीकरण मोहिमेतही त्यांचे भरीव असे काम नाही. शिवाय हे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहात नाहीत. त्याचा हा परिणाम असल्याचे आढळले. यामुळे त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य विभागाने तयार केला आहे.

यापूर्वीही झाली होती कारवाईडिसेंबर महिन्यात कामाप्रति निष्काळजीपणा करणाऱ्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तर एकाला कार्यमुक्त करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला होता. या कारवाईसोबतच दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ तीन वर्षे रोखण्याची कारवाई केली होती. या कारवाईला दोन महिने होत असतानाच आणखी दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरAurangabadऔरंगाबाद