शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीबाहेरील नाले भूमिगत करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 12:21 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीबाहेरील परिसरात वाहणारे नाले भूमिगत करण्याची गरज आहे. यामुळे विमानतळाच्या हद्दीत वावरणारे पक्षी, मोकाट कुत्रे आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येतील. यासाठी महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

औरंगाबाद, दि. २५  : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीबाहेरील परिसरात वाहणारे नाले भूमिगत करण्याची गरज आहे. यामुळे विमानतळाच्या हद्दीत वावरणारे पक्षी, मोकाट कुत्रे आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येतील. यासाठी महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

विमानतळाच्या हद्दीतून तीन नाले वाहत आहेत. जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी आदी भागांतून वाहणारे नाले थेट विमानतळाच्या संरक्षक भिंतीखालून वाहत धावपट्टीखालून जातात. बाराही महिने वाहणा-या या नाल्यांमुळे परिसरात पक्ष्यांचा मुक्त संचार दिसतो. नाल्यातून प्लास्टिकच्या पिशव्या, मेलेली जनावरे असा कचरा संरक्षक भिंतीजवळच जमा होतो. त्यामुळे नाल्यातील कच-यातून मिळणा-या खाद्यपदार्थांमुळे पक्ष्यांबरोबर मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार होत आहे. यातून अनेकदा विमानांच्या उड्डाणात अडथळा निर्माण होण्याच्या घटना होतात.

ही परिस्थिती लक्षात घेऊन विमानतळ प्राधिक रणाने विमानतळाच्या हद्दीतील नाले भूमिगत करण्यासाठी पुढाकार घेतला. निविदा प्रक्रियेनंतर एप्रिल महिन्यात नाले भूमिगत करण्याचे काम सुरू झाले. पावसामुळे कामात अडचणी येत आहेत; परंतु लवकरच विमानतळाच्या हद्दीतील नाले भूमिगत होतील; परंतु केवळ विमानतळाच्या हद्दीतील नाले भूमिगत करून हा प्रश्न सुटणार नाही. संरक्षक भिंतीखालून येणाºया नाल्यांमध्ये प्राधिक रणातर्फे लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. या जाळ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. त्यातून पक्षी, मोकाट कुत्र्यांना आयते खाद्यपदार्थ मिळत आहेत, त्यामुळे  विमानतळाच्या हद्दीबाहेर वाहणारे नालेही भूमिगत होण्याची गरज आहे, तरच हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. नाल्यांमुळे निर्माण होणा-या अडचणींविषयी विमानतळ प्राधिक रणाने मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना माहिती दिली. त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी मनपा आयुक्तांनी नाल्यांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी पाहणी केल्यामुळे नाल्यांचा प्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मनपा आयुक्तांना माहिती दिली आहेविमानतळाच्या हद्दीतील नाले भूमिगत करण्याचे काम प्राधिकरण करीत आहे. विमानतळाच्या परिसरात वाहणा-या नाल्यांचा मार्ग वळविणे अथवा भूमिगत करण्याचे काम महापालिकेने केले पाहिजे. नाल्यांच्या प्रश्नासंदर्भात मनपा आयुक्तांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष नाल्यांची पाहणी केली आहे.- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ