हिंगोली : महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी दिलेला सत्य, अहिंसेचा विचार समाजाला पुढे नेणारा असून त्यांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सदस्य महंत चिरडेबाबा निफाडकर यांनी केले.हिंगोली येथील सुखदा मंगल कार्यालयात जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीने आयोजित दोन दिवशीय भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिनोत्सव सोहळ्यात रविवारी महंत चिरडेबाबा यांचे प्रवचन झाले. अध्यक्षस्थानी महंत खेडकरबाबा वसमतकर होते. याप्रसंगी महंत पंडित बाबा अमृते, पैठणकर बाबा रोडगेकर, श्रीधरबाबा वाघोदेकर, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. गजानन घुगे, जि. प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शिक्षण सभापती रंगराव कदम, हिंगोलीचे उपनगराध्यक्ष जगजित खुराणा, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, डॉ. साहेबराव देशमुख, मनिष आखरे, माधव कोरडे, डॉ. जयदीप देशमुख, गोविंद पडोळे, साहेबराव पडोळे, बबनराज कपाटे, महंत बाबा वाघोदेकर, माधेराज उदरभरे, गोविंदराव बाबा अमृते, मुंजाजीराव इंगोले, दत्तराव इंगोले, बाबूराव गुंडाळे, नवनित फटाले, आबासाहेब शिंदे, बाबाराव पडोळे, मोहनराव पडोळे, प्रताप पडोळे, वसंतराव पडोळे, संत राज बाबा विद्धंस, गोवर्धनकर बाबा, विजयराज नांदेडकर, श्रीधर कोठी, मयंकराज बाबा खेडकर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना महंत चिरडेबाबा यांनी, श्री चक्रधर स्वामी यांच्या कार्याची महती सांगुन अंधश्रद्धा निर्मुलन व व्यसनमुक्ती बाबतचे त्यांचे विचार आत्मसात करावेत, असा उपदेश केला. या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्यातील महानुभाव पंथीय व अनुयायी महिला- पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा ‘सत्यपालाची सत्यवाणी’ हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. जयदीप देशमुख, मनोज आखरे, मनीष आखरे, माधव कोरडे, बालाजी गुंडाळे, सुरेश पडोळे हजर होते. सत्यपाल महाराज यांनी समाजातील अनिष्ट रुढी- परंपरांवर कीर्तनाच्या माध्यमातून टीका केली.
समाजाला चक्रधर स्वामींच्या विचारांची गरज
By admin | Updated: September 1, 2014 00:28 IST