शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

राष्ट्रवादीची कामगिरी असमाधानकारक

By admin | Updated: June 15, 2017 23:41 IST

नांदेड : स्थापनेची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील कामगिरीबद्दल पक्षाचे नेते अजित पवार यांनी असमाधान व्यक्त केले

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : स्थापनेची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील कामगिरीबद्दल पक्षाचे नेते अजित पवार यांनी असमाधान व्यक्त केले असून पक्ष वाढविण्याची जबाबदारी पेलवत नसेल तर पदे सोडा असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे़ पक्ष संघटन मजबूत असेल तर यश मिळतेच असेही त्यांनी सांगितले़ पक्ष संघटन वाढविण्याच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण व शहर विभागाचा विस्तृत आढावा घेतला़ महिला पदाधिकाऱ्यांच्या समस्याही या दौऱ्यात जाणून घेण्यात आल्या़ राष्ट्रवादीचे नेते पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी प्रारंभी जिल्हा कार्यकारिणीच्या कामाचा आढावा घेतला़ त्यानंतर तालुका आणि शहर विभागांचा विस्तृत आढावा घेताना प्रत्येक तालुकाध्यक्षांना पक्षविस्तारासाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला़ त्यात कार्यकारिणी स्थापनेपासून तालुक्यात पक्षाची असलेली स्थिती त्यांनी जाणून घेतली़ यात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी आणखी जोमाने काम करण्याचा सल्ला दिला तर काम न करणाऱ्यांना पदे सोडून दुसऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचे सांगितले़ पक्ष वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी बाहेर पडावे, केवळ पत्रिकांवर छापण्यासाठी पदे ठेवू नका असेही त्यांनी स्पष्ट केले़या आढाव्यादरम्यान मुखेड तालुकाध्यक्षांनी पक्षातील मंडळीकडूनच काम करताना अडचणी निर्माण केल्या जात असल्याची तक्रार केली़ तर अर्धापूर तालुकाध्यक्षांनी काम करूनही पक्षाची, पदावरील मंडळीकडून हवी तशी साथ मिळत नसल्याचे सांगितले़ मुदखेड, नांदेड तालुकाध्यक्षांनी बैठकीला मारलेली दांडी पवार यांनी गंभीरतेने घेताना अशा लोकांना पदावर ठेवल्यास पक्ष वाढणारच नाही असे सांगितले़ नांदेड शहर कार्यकारिणीच्या आढाव्यातही पक्षाचे भीषण चित्र नेत्यांसमोर आले़ विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराला ६ टक्के मते मिळाली तर नांदेड दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ अर्धा टक्के मते मिळाली़ पक्षाचे उमेदवार हे १० व्या क्रमांकावर राहिले़ १ हजार मतेही आपला उमेदवार मिळवू शकला नाही, ही परिस्थिती असेल तर पदाधिकारी करतात काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना बहुतांश वार्डात पक्षाची शाखा नाही़ कार्यकारिणीच्या बैठका नाहीत इतकेच नव्हे तर मुंबईत होणाऱ्या बैठकांना शहराध्यक्षही येत नाहीत़ ही परिस्थिती बदला अशी तंबीही यावेळी देण्यात आली़ बैठकीस माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर, शहराध्यक्ष डॉ़ सुनील कदम, जि़ प़ उपाध्यक्ष समाधान जाधव, रामनारायण काबरा, माजी आ़ शंकर धोंडगे, माजी आ़ हरिहरराव भोसीकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे, माजी जि़ प़ उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, फेरोज लाला, प्रांजली रावणगावकर, कृष्णा मंगनाळे, कल्पना डोंगळीकर, निर्मला कांबळे, माजी मनपा विरोधी पक्ष नेता जीवन पाटील घोगरे, रमेश सरोदे, एकनाथ वाघमारे, भारत काकडे, गणेश तादलापूरकर, जर्नेलसिंघ गाडीवाले यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी सदस्य आदींची उपस्थिती होती़