शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रात प्रशासनाची ‘सत्त्वपरीक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:11 IST

सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्त्याचे काम घटस्थापनेपूर्वी पूर्ण झाले नाही तर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची सत्त्वपरीक्षा प्रशासनाला द्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्त्याचे काम घटस्थापनेपूर्वी पूर्ण झाले नाही तर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची सत्त्वपरीक्षा प्रशासनाला द्यावी लागणार आहे. यामध्ये एकीकडे पोलिसांची डोकेदुखी वाढणार, वाहनधारकांचे हाल होणार, तर दुसरीकडे भक्तांची तारांबळ उडणार आहे. हे संकट सोडविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे; परंतु महामार्ग वळणरस्ता तीन दिवसांत सुरू झाला तर काहीअंशी वाहतूक कोंडी सुटू शकते.शहरातून जाणाºया सोलापूर-धुळे महामार्गावर असणाºया बार्शी नाका येथील बिंदुसरा नदीवरील जुना पूल धोकादायक झाल्याने वाहतूक बंद केली आहे, तर पर्यायी पूल गतमहिन्यात झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी तोडगा काढून अवजड वाहतूक गढी व मांजरसुंबा मार्गे वळविली. तसेच काही वाहने जालना रोडवरील मोंढा टी पॉर्इंटवरून एमआयडीसी, खंडेश्वरी मंदिर परिसर मार्गे तेलगावकडे वळविली. अशीच तेलगाव नाक्याकडून येणारी वाहने वळविण्यात आली आहेत.दरम्यान, अवघ्या तीन दिवसांवर नवरात्रौत्सव येऊन ठेपला आहे. ज्या मार्गे वाहतूक वळविली आहे, अशा मार्गावरच ग्रामदैवत खंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर नऊ दिवस मोठी यात्रा भरते. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विशेष म्हणजे रस्त्यावरच काही दुकाने लावली जातात. नवरात्रौत्सवात या परिसरात छोट्या-मोठ्या वाहनांनाही वाहतुकीस मज्जाव करण्यात येतो. केवळ भक्तांना येथे पायी प्रवेश दिला जातो. यामुळे काही अंशी वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिसांना यश येते; परंतु सद्य:स्थितीत खंडेश्वरी देवी मंदिरासमोरील रस्त्यावरून अवजड वाहतूक सुरू असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. आता ही वाहतूक कोंडी सोडवायची कशी, असा यक्षप्रश्न वाहतूक पोलिसांसह प्रशासनाला पडला आहे.नवरात्रौत्सवातील बंदोबस्ताचे नियोजन झाले आहे. वाहतूक वळविण्यासंदर्भात पाहणी केली आहे. रस्ता दुरुस्ती संदर्भात संबंधित विभागांना भेटणार आहे. सकारात्मक विचाराने काम सुरू असल्याचे पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.