शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

नवरात्रोत्सवातील अन्नछत्रेही आचारसंहितेच्या कचाट्यात

By admin | Updated: September 13, 2014 23:35 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव २५ सप्टेंबरपासून सुरू होत असून, या कालावधीत पायी येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूरकडे येणाऱ्या रस्त्यांवर

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव २५ सप्टेंबरपासून सुरू होत असून, या कालावधीत पायी येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूरकडे येणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अन्नछत्र उभारले जातात. परंतु निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू केली असल्याने यातील राजकीय लोकांच्या अन्नछत्रावर आता बंधने आली आहेत. राजकीय नेत्यांनी अशी अन्नछत्रे उभारल्यास संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. शासनाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तयारीबाबतची माहिती दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी भालचंद्र चाकूरकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी के. बी. कोंडेकर आदींची उपस्थिती होती. डॉ. नारनवरे म्हणाले, जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ असून, यातील उस्मानाबाद, तुळजापूर व परंडा हे खुले तर उमरगा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. उमरगा विधानसभा मतदार संघासाठी उपविभागीय अधिकारी रविंद्र गुरव, तुळजापूरसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. घुगे, उस्मानाबादसाठी उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड तर पंरडयासाठी उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात बी.एल.ओ मार्फत मतदारांना व्होटर स्लिप वाटप करण्यात येत असल्याचे सांगून जिल्ह्यात एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नसल्याचे डॉ. नारनवरे म्हणाले. लोकसभेसाठी सर्वच मतदारांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, अनेकांचे पत्ते चुकीचे असल्याने या निवडणुकीत टपाली मतदान कमी झाले. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी सैन्य दलातील तसेच शासकीय नोकरदारांचे बदलले पत्ता संबधित खात्याकडून नव्याने घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २० सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द होणार आहे. यानंतर २७ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र सादर करणे तर २९ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची शेवटची तारीख १ आॅक्टोबर असून, १५ आॅक्टोबर रोजी मतदान तर १९ रोजी मतमोजणी होणार असल्याचे पत्र परिषदेत सांगण्यात आले. मतदार यादीत कुणाची नावे चुकलेली असल्यास किंवा नावनोंदणी करायची राहिली असल्यास त्यांनी विहित नमुन्यातील फॉर्म भरून देऊन ती करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ हजार ७०० बॅलेट युनिट व २ हजार २०० कंट्रोल युनिट एवढ्या व्होटींग मशीन प्राप्त झाल्या असून, सदरील मशिनची प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विधानसभेसाठी १२ लाख २१ हजार २५८ मतदार असून, यात ६ लाख ५७ हजार ५१६ पुरुष, ५ लाख ६३ हजार ७२७ स्त्री व १५ इतर मतदारांचा समावेश आहे. याशिवाय चार मतदारसंघासाठी १ हजार ३५९ मतदान केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. ४उमरग्यात ३०१, तुळजापूर ३७०, उस्मानाबाद ३४५ तर परंडयात ३४३ असे एकुण चार विधानसभा मतदारसंघासाठी एकूण १ हजार ३५९ मतदान केंद्रे आहेत.