शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यमहोत्सव हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:06 IST

उस्मानाबाद : २१ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर रविवारपासून नाट्यमहोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

उस्मानाबाद : २१ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर रविवारपासून नाट्यमहोत्सवाला प्रारंभ झाला आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारीही रसिकांच्या प्रचंड उपस्थितीने नाट्यमहोत्सव स्थळ तुडूंब भरले होते. विशेष म्हणजे महिलांची उपस्थितीही या कार्यक्रमांना लक्षवेधी लाभत आहे. २१ एप्रिलपासून येथील जिल्हा क्रीडा संकुलावर अखिल भारतीय नाट्यसंमेलन रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर १६ एप्रिलपासून पाच दिवसीय नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १६ एप्रिल रोजी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यालाच रसिकांनी अभूतपूर्व उपस्थिती लावली होती. उद्घाटन सोहळ्यानंतर रंगमंचावर सादर झालेल्या ‘आॅल दी बेस्ट’ या नाट्यकृतीने उपस्थितांची मने जिंकली. ‘आॅल दी बेस्ट’ मध्ये असलेल्या नव्या दमाच्या युवा कलाकारांनी मोठ्या ताकदीने हा विनोदी प्रयोग पार पाडला. महोत्सवाचा दुसरा दिवसही असाच प्रचंड प्रतिसादाचा ठरला. यदा कदाचित या नाट्यकृतीलाही रसिकांनी भरभरुन दाद दिली. त्यानंतर रात्री उशिरा सुरेखा पुणेकर प्रस्तुत नटरंगी नार हा लावण्यांचा धडाकेबाज कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमावेळी जिल्हा क्रीडा संकुलावरील मुख्य रंगमंच फुलून गेला होता. यामध्ये महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. नाट्यमहोत्सवाच्या संयोजन समितीने केलेल्या चोख नियोजनाचेही नाट्यरसिकांतून कौतुक होत आहे.