उस्मानाबाद : भूम तालुक्यातील ईडा जवळा येथील बाणगंगा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. चाचणी गळीत हंगाम झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही प्रमुख पक्ष आमने- सामने आहेत. सतरा जागांसाठी राष्ट्रवादीकडून २१ तर शिवसेनेकडून २७ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. १० जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत असल्याने प्रमुख लढतींचे चित्र यानंतरच स्पष्ट होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. राहुल मोटे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या बाणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. कारखाना ताब्यात घेण्यासाठी शिवसेनाही सरसावली आहे. राष्ट्रवादीकडून सर्वच्या सर्व १७ जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. २१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राहुल मोटे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मधुकर मोटे आदी पदाधिकारी ठाण मांडून होते. शिवसेनेनेही १७ पैकी १६ जागांवर उमेदवार उतरविले आहेत. जवळपास २७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, जि.प. गटनेते दत्ता साळुंके, अॅड. सुभाष मोरे, सभापती दत्ता मोहिते, माजी सभापती धनंजय सावंत, गौतम लटके, काकासाहेब चव्हाण, बाळासाहेब उंदरे आदींची उपस्थिती होती. तसेच काही मतदार संघातून भाजपानेही उमेदवार उतरविले आहेत. त्यामुळे बाणगंगा कारखान्याची ही पहिलीच निवडणूक रंगतदार होणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे. २५ मे पर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी करून पात्र, अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. तर १० जूनपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर १७ जून रोजी मतदान होईल. तर १९ जून रोजी मतमोजनी होणार आहे. दरम्यान, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाणगंगा साखर कारखान्याचा पहिला चाचणी गळीत हंगाम २०१३-२०१४ मध्ये घेण्यात आला. त्यानंतर हा कारखाना सुरळीत चालेल, अशी अपेक्षा ऊसउत्पादक शेतकरी, सभासदांना होती. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळेच हक्काचा कारखाना असतानाही परिसरातील शेतकऱ्यांना अन्य कारखान्यांना ऊस घालावा लागल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याच नाराजीचा फायदा शिवसेनापुरस्कृत भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलकडून उचलू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या नाराजीचा फटका बसू नये, म्हणून कुठल्या प्रकारची व्यूहरचना आखली जाते, हे येणाऱ्या काळातच दिसून येणार आहे. (प्रतिनिधी)रोहकल आनाळा गट : दादासाहेब पाटील, भाऊसाहेब खरसडे (राष्ट्रवादी), अमर सुभाषराव मोरे, दत्तात्रय औताडे (सेना), लुगडे दादासाहेब महादेवराव (--).४उत्पादक संस्था गट : आ. राहुल मोटे. ४अ.जा/अ.ज. गट : गौरिशंकर साठे (राष्ट्रवादी), मस्तूद मारूती आंबू, अर्जुन ठोसर, काशीनाथ कांबळे (शिवसेना). ४महिला गट : वैशालीताई मोटे, आशाबाई जाधव, मायावती कोकाटे (राष्ट्रवादी), गंगाविठ्ठल जनाबाई दासा, चौधरी रजियाबी शेख मैनोद्दीन, विजया खैरे (सेना), नलवडे काशिबाई दासराव, हौसाबाई विश्वनाथ जाधव (--). ४इतर गट : विष्णू शेवाळे (राष्ट्रवादी), बाळासाहेब शेवाळे , शिवाजी सुतार (शिवसेना). ४व्हीजे/एनटी गट : मारूती हरिदास मासाळ (राष्ट्रवादी), माणिक शिंदे, बळीराम मारकड (शिवसेना).वाशी गट : अरूणोजीराव देशमुख, कल्याण आखाडे (राष्ट्रवादी), अशोक आटोळे, सतीश गव्हाणे, युवराज सावंत, बबन कोल्हे (सेना). ४गिरवली गट : आ. राहुल मोटे, वैशालीताई मोटे, मधुकर मोटे, संजय गाढवे (राष्ट्रवादी), भाऊसाहेब लिमकर, वसंत कांबळे, रामकिशन चौधरी, गोकूळ मस्के, निळकंठ भोरे (सेना). ४ईडा जवळा (नि) : तात्यासाहेब गोरे, महादेव खैरे, शशिकला खैरे (राष्ट्रवादी), माणिक शिंदे, अभिमान सांगडे, शशिकांत लटके (सेना), अनिल देशमुख (बीजेपी). ४परंडा पाचपिंपळा गट : विश्वनाथ खुळे, दशरथ घोगरे (राष्ट्रवादी), राजकुमार जैन, अशोक खैरे, गौतम लटके (सेना), भालचंद्र नेटके, किशन व्यंकटेश गाढवे (--).
‘बाणगंगा’च्या आखाड्यात राष्ट्रवादी-सेना आमने सामने!
By admin | Updated: May 23, 2015 00:39 IST