शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद खंडपीठात राष्ट्रीय लोकअदालत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:20 IST

सर्वोच्च न्यायालयापासून ते तालुका पातळीपर्यंत सर्वच न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणाची संख्या लक्षात घेता, काही प्रकरणांमध्ये तरी सर्वसामान्यांना तात्काळ आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयापासून ते तालुका पातळीपर्यंत सर्वच न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणाची संख्या लक्षात घेता, काही प्रकरणांमध्ये तरी सर्वसामान्यांना तात्काळ आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना आहे. गेल्या काही वर्षांत त्याच्या प्रभावी वापराने लाखो लोकांना वेळेत न्याय मिळाला, हजारो कोटी रुपयांचे दावे निकाली निघाले, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे ताहीलरमानी यांनी केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (दि.९ डिसेंबर) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती ताहीलरमानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या लोकन्यायालयाचे उद्घाटन झाले.यावेळी मंचावर औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती न्या. आर. एम. बोर्डे तसेच खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख उपस्थित होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीचे चेअरमन न्या. आर. एम. बोर्डे यांच्या आदेशावरून या लोकन्यायालयाने आयोजन करण्यात आले होते. न्या. ताहीलरमानी यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व विशद करताना, सामंजस्याने, परस्पर संमतीने आणि तडजोडीने निकाली निघणाºया, लोकन्यायालयात प्रकरणांमुळे सर्वच पक्षांना खरा न्याय मिळाल्याचे समाधान मिळते, असे सांगितले.या प्रसंगी न्या. आर. एम. बोर्डे यांनी लोकन्यायालय आयोजन आणि त्याला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. आजपर्यंत आयोजित चार लोकन्यायालयांत एकंदर २५६३ प्रकरणे दाखल होऊन एक हजार २५६ प्रकरणे निकाली निघाल्याची माहिती त्यांनी दिली. येथील आयोजनाने राष्ट्रीय पातळीवर उच्चांक केल्याचेही त्यांनी सांगितले. आज झालेल्या लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणे तसेच भूसंपादन केल्यापोटी व शेतकºयांना मोबदला मिळण्यासाठी दाखल प्रकरणावर सुनावणी झाली. कार्यक्रमाला खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती, लोकन्यायालयात आज सहभागी झालेले निवृत्त न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, वकील वर्ग, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.