शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद येथे घाटीत लवकरच राष्ट्रीय आपत्कालीन जीवन संरक्षण प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 18:24 IST

सुपर स्पेशालिटी विभाग, आयुष रुग्णालयापाठोपाठ केंद्र सरकारच्या सहकार्याने घाटी रुग्णालयात राष्ट्रीय आपत्कालीन जीवन संरक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

औरंगाबाद : सुपर स्पेशालिटी विभाग, आयुष रुग्णालयापाठोपाठ केंद्र सरकारच्या सहकार्याने घाटी रुग्णालयात राष्ट्रीय आपत्कालीन जीवन संरक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्रीय पथकाने बुधवारी (दि.२८) केलेल्या पाहणीत या केंद्रासाठी जुन्या वॉर्ड क्रमांक ७ च्या परिसरातील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

डॉ. जितेंद्र अरोरा, डॉ. ए.जी. अलोनो, वास्तुविशारद एस.के. गौर यांनी ही पाहणी केली. या केंद्रासाठी पथकाने घाटीतील काही जागांची पाहणी के ली. अखेर मेडिसिन विभागाच्या परिसरातील ६७० चौ.मी. जागेची निवड करण्यात आली. महाराष्ट्रात चार ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबादेतील घाटी रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. जवळपास १ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या बांधकामातून हे केंद्र उभारले जाईल.

अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. शिवाजी सुक्रे, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. विजय गायकवाड, डॉ. कैलास चितळे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. अनंत बीडकर आदींची पाहणीप्रसंगी उपस्थिती होती. या केंद्राच्या उभारणीसाठी समन्वयक म्हणून डॉ. विजय गायकवाड हे काम पाहत आहेत. पाहणीनंतर केंद्राच्या जागेसंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला. केंद्र शासनामार्फतच संपूर्ण उभारणी होणार असल्याचे डॉ. भट्टाचार्य यांनी सांगितले. डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकलचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्राची उभारणी केली जात आहे. यातून आपत्कालीन परिस्थितीत वेळीच प्राथमिक उपाचारासह विविध कौशल्य आत्मसात करण्यासंदर्भात मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद