शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाथ सुपरमार्केट ठेवणार गहाण

By admin | Updated: November 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : महापालिकेने समांतर जलवाहिनीसाठी १००, महावितरणची थकबाकी देण्यासाठी १००, असे २०० कोटी रुपयांचे कर्ज २०११-१२ मध्ये काढले आहे

औरंगाबाद : महापालिकेने समांतर जलवाहिनीसाठी १००, महावितरणची थकबाकी देण्यासाठी १००, असे २०० कोटी रुपयांचे कर्ज २०११-१२ मध्ये काढले आहे. या कर्जासाठी अब्जावधी किमतीची मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवण्याचा करार मनपाने केला आहे. त्यासाठी औरंगपुऱ्यातील नाथ सुपरमार्केट, गारखेडा रिलायन्स मॉलमधील मनपा मालकीची जागा, झांशी की राणी उद्यान परिसर आणि पदमपुऱ्यातील फायर ब्रिगेड कॉम्प्लेक्ससह १३ मोक्याच्या ठिकाणांवरील मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवण्यात येणार आहेत. बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत काही अब्जावधी रुपयांत जाते. यापूर्वी मनपाने १७ मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत. मात्र, मनपाने गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन बँकेने १७० कोटी रुपये काढले आहे. त्यामुळे पालिकेला दरमहाच्या व्याज व मुद्दल फेडीच्या रकमेत १ टक्का अतिरिक्त जास्तीचे व्याज भरावे लागत आहे. १६ लाख रुपये दरमहा जास्तीचे जात आहेत. २०० कोटींच्या परतफेडीसाठी मनपा ३ कोटी ६६ लाख रुपये अदा करीत आहे. मनपाकडे समांतर योजनेसाठी ९३ कोटी रुपये ‘एएसओजी’ खात्यावर ठेवण्यासाठी नव्हते. त्यामुळे बँकेकडून कर्जरूपाने ती रक्कम उभी करण्यात आली, तसेच महावितरणची ३५० कोटी रुपयांची थकबाकी मनपाकडे होती. वन टाईम सेटलमेंटने थकबाकीतील १०० कोटी भरण्यात आले. कर्ज काढून १०० कोटी रुपये मनपा सत्ताधाऱ्यांनी अदा केले. १३ मालमत्ता गहाण ठेवण्याबाबत कुणाला आक्षेप असेल, तर ७ दिवसांत बँकेकडे अथवा मनपाकडे नोंदविता येतील. वेदांतनगर, रेल्वेस्टेशन १८३४९/१/९९ ४०५७ चौ.मी.रेल्वेस्टेशन, व्यापारी संकुल१९२५९/११४४४ चौ.मी.रेल्वेस्टेशन, व्यापारी संकुल१९२५९४५१.४३ चौ.मी.पदमपुरा, फायर ब्रिगेड कॉम्प्लेक्स१९६४५६१६.९० चौ.मी.गारखेडा१५७३५/१६२९५ चौ.मी.विश्वभारती कॉलनी सर्व्हे नं.६१/५१५७३५/१०३८७६ चौ.मी.शहानूरवाडी१६३२१/१४०४२.१६ चौ.मी.शहानूरवाडी१६३२१/३१५६३.१७ चौ.मीशहानूरवाडी१६३२१/२३९०५.१७ चौ.मीपदमपुरा१९६६०१५६८ चौ.मी.कांचनवाडीगट क्र.४७/३४४६१.०४ चौ.मीनाथ सुपर मार्केटसर्व्हे नं.८०क्षेत्रफळ दिले नाहीक्रांतीचौकसर्व्हे नं.५४८५०९.३४ चौ.मी.मनपा हद्दीतीतील फायर ब्रिगेड हे विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेत नेऊन ते सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी पदमपुरा येथे मुख्यालय बांधण्याचे काम सुरू आहे. ४त्याचे काम अजून बाल्यावस्थेतच असताना ते कॉम्प्लेक्स गहाण ठेवण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. हे केंद्र होण्यापूर्वीच गहाण राहण्याची आपत्ती त्याच्यावर आली आहे.