शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद पुलावरुन दुचाकी पडली

By admin | Updated: June 10, 2014 00:15 IST

येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावरुन दुचाकीसह तिघेजण पुलावरुन खाली पडून गंभीर जखमी झाले. ९ जून रोजी सायंकाळी ६़४५ वाजता ही घटना घडली़

येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावरुन दुचाकीसह तिघेजण पुलावरुन खाली पडून गंभीर जखमी झाले. ९ जून रोजी सायंकाळी ६़४५ वाजता ही घटना घडली़सोमवारी ज्ञानदेव सूर्यकांत अंभोरे (वय ३५), बबन हरिभाऊ मोरे (४०) व दादाराव आश्रोजी नवघरे (सर्व रा. रिसोड) हे तिघे एका दुचाकीवरुन येलदरी येथून रिसोडकडे निघाले. त्यांची दुचाकी येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावर आल्यानंतर दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला आणि तिघेही दुचाकीसह पुलावरून खाली पडले़ यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले़ ही घटना सोमवारी सायंकाळी ६़४५ वाजता घडली़या घटनेची माहितीे येलदरी येथील शेषराव चव्हाण व अनंत माकोडे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाखाली पाण्यात पडलेल्या जखमींना बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले़ परंतु, त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींना रुग्णवाहिकेतून जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयातात दाखल केले़ जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर ज्ञामदेव अंभोरे व बबन मोरे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे़ (वार्ताहर)बळी घेतल्यानंतर पुलाचे काम होणार का ?जिंतूर- रिसोड महामार्गाला जोडणारा पूल येलदरी धरणाजवळ ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधलेला आहे. हा पूल अरुंद आहे़ त्यामुळे या पुलावरुन जड वाहतूक होत नाही़ एका वेळी एकच मोठे वाहन पुलावरून जाते़ त्यामुळे या पुलावर दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे़ गेल्यावर्षी या पुलावर बसचालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून बस खाली पडली होती. यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला़ त्यानंतर १७ मे रोजी एका ट्रेलरने या पुलावरील सगळे कठडे तोडून टाकले़ त्यामुळे हा पूल आणखीच अरुंद झाला आहे़ पुलाला कठडे नसल्याने दुचाकीस्वार पुलावरुन नदीत पडले़ पुलाखाली पाणी असल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही़ अशा घटना होऊनही बांधकाम विभागाला देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे़नवीन पुलाचे काम कधी होणार?येलदरी धरणाजवळी पूल अरुंद असल्याने जड वाहतूक करणे अवघड झाले आहे़ हा पूल मराठवाडा व विदर्भाला जोडणार असून या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे़ एखादी जीवित हानी झाल्यानंतरच नवीन पुलाचे काम सुरू होत की काय? असा प्रश्न ग्रामस्थांमधून केला जात आहे़