शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नारेगावात कचरा टाकण्यास कायम मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:09 IST

नारेगाव-मांडकी येथे यापुढे कोणताही कचरा टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायमस्वरूपी मनाई केली आहे. या ठिकाणी सध्या असलेल्या कच-यावर योग्य त्या शास्त्रीयपद्धतीने प्रक्रिया करून एका वर्षात येथील जमीन पूर्ववत करण्याचे तसेच या ठिकाणी कचरा न टाकण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या २००३ मधील आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कारण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी दिले.

ठळक मुद्देआंदोलनाचा विजय : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा अंतिम निकाल; नागरिकांमध्ये आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगाव-मांडकी येथे यापुढे कोणताही कचरा टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायमस्वरूपी मनाई केली आहे. या ठिकाणी सध्या असलेल्या कच-यावर योग्य त्या शास्त्रीयपद्धतीने प्रक्रिया करून एका वर्षात येथील जमीन पूर्ववत करण्याचे तसेच या ठिकाणी कचरा न टाकण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या २००३ मधील आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कारण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी दिले.गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरातील कचरा साठविला जात असलेल्या नारेगाव येथील कचरा डोपोमध्ये कचरा टाकण्याविरोधात मांडकी, गोपाळपूर, पळशी, पोखरी आणि महालपिंप्री या गावांतील काही नागरिकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर खंडपीठाने शुक्रवारी (दि.९ मार्च) विस्तृत अंतिम निकाल जाहीर केला.गेली ३३ वर्षे या ठिकाणी कचरा टाकण्याची बेकायदा कृती महापालिका करीत आहे, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असे या आदेशात प्रारंभीच म्हटले आहे. नारेगाव-मांडकी येथे सध्या असलेल्या कचºयावर १२ महिन्यांत योग्य ती प्रक्रिया करण्यासाठी आयआयटीसारख्या संस्थांची मदत घेण्याचे आदेशात सुचविण्यात आले आहे.या ठिकाणी झालेल्या प्रदूषणाविरोधात संबंधित अधिकारी, राजकीय नेते यांच्या विरोधात दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणे दाखल करण्यास याचिकाकर्त्यांना मुभा देण्यात आली असून, यासाठी आवश्यक रेकॉर्ड महापालिकेने याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून द्यावे. औरंगाबाद खंडपीठाने ७ जुलै २००३ ला नारेगाव येथील कचरा सहा महिन्यांत तेथून हलविण्याचा दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुख्य सचिवांनी चौकशी करावी आणि त्याचा अहवाल तीन महिन्यांत खंडपीठात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला या संदर्भात दिलेल्या नोटिशींच्या अनुषंगाने आवश्यक ते आदेश द्यावेत आणि संबंधितांवर न्यायोचित फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. याचिककर्त्यांना योग्य त्या न्यायालयासमोर नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यावर कायद्यानुसार विचार करण्यात यावा, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. याशिवाय पिण्याकरिता स्वच्छ पाणी मिळण्यासंदर्भात याचिकाकर्त्यांच्या विनंतीवर महापालिकेने तीन महिन्यांत निर्णय घेण्याचेही आदेशात नमूद केले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी, शासनातर्फे अ‍ॅड. अमरजितसिंह गिरासे, मनपातर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, केंद्र शासनातर्फे अ‍ॅड. संजीव देशपांडे, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. महेंद्र नेर्लीकर यांनी काम पाहिले.