शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नारेगावच्या शेतकर्‍यांचे मनपाला अल्टिमेटम; महापौरांनी मागितली 2 महिन्यांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:43 IST

नारेगाव भागातील शेतकर्‍यांनी १६ जानेवारीनंतर कचरा येऊ देणार नाही, असा इशारा शुक्रवारी महापालिकेला दिला. यापूर्वी महापालिकेने कचरा टाकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली होती. ही मुदत संपण्यास काही दिवस शिल्लक आहेत. मनपा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही शिष्टमंडळाने महापौरांकडे केली.

औरंगाबाद : नारेगाव भागातील शेतकर्‍यांनी १६ जानेवारीनंतर कचरा येऊ देणार नाही, असा इशारा शुक्रवारी महापालिकेला दिला. यापूर्वी महापालिकेने कचरा टाकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली होती. ही मुदत संपण्यास काही दिवस शिल्लक आहेत. मनपा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही शिष्टमंडळाने महापौरांकडे केली. मनपाकडून उपाययोजना झाल्या नाहीत, आणखी दोन महिने मुदतवाढ द्यावी, अशी विनंती महापौरांतर्फे करण्यात आली.

मागील वर्षी ऐन दिवाळीत कचर्‍याच्या गाड्या शेतकर्‍यांनी अडविल्या होत्या. तीन दिवस जोरदार आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणात विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी हस्तक्षेप करून शेतकर्‍यांना आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली होती. आंदोलकांनी महापालिकेला तीन महिन्यांचा अवधी दिला होता. १६ जानेवारी रोजी शेतकर्‍यांनी दिलेली मुदत संपत आहे. शुक्रवारी नारेगाव, मांडकी व आसपासच्या शेतकर्‍यांचे एक शिष्टमंडळ शुक्रवारी महापालिकेत दाखल झाले. आयुक्त नसल्यामुळे शिष्टमंळाने महापौर नंदकुमार घोडेले, सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे यांची संयुक्त भेट घेतली.

कचरा डेपो हटाव आंदोलन कृती समितीचे प्रमुख पुंडलिक (अप्पा) अंभोरे, मनोज गायके, रवी गायके, विष्णू चौथे, शाईनाथ चौथे, परमेश्वर भुमे, कल्याण औटे यांच्यासह आता नारेगाव कचरा डेपोत टाकणे थांबवा. १६ जानेवारीपासून कचर्‍याचे ट्रक डेपोत येऊ देणार नाही, असा इशारा दिला. कचर्‍यामुळे या भागातील नागरिकांना कोणता त्रास होतोय, याची जाणीव मनपाला अजिबात नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. महापौर घोडेले यांनी कचरा डेपोसाठी नवीन जागा उपलब्ध करून प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्याची विनंती केली. नारेगावातील कचर्‍याचा डोंगर नष्ट करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही सांगितले.

आमच्यामुळे चीन दौराशहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करणे, नारेगाव येथील कचरा नष्ट करणे यासाठी मनपा अधिकारी व पदाधिकार्‍यांनी चीन दौरा केल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले. यावर शिष्टमंडळातील ज्येष्ठ नागरिक पुंडलिक अंभोरे यांनी नमूद केले की, आमच्यामुळे तुमचे सर्व दौरे चालू आहेत. घ्या एकदाचे फिरून म्हणत पदाधिकार्‍यांना टोला लगावला.

ठोस निर्णयच नाहीमागील तीन महिन्यांत मनपातील अधिकारी व पदाधिकार्‍यांनी शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याबाबत ठोस असा कोणताच निर्णय घेतला नाही. विविध शहरांमध्ये प्रकल्प पाहणी, महापालिकेत येणार्‍या कंपन्यांचे डेमो पाहणे यातच अधिक वेळ वाया घालविण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद