शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना वाव देणारे नांदेड विद्यापीठ देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:50 IST

कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देवून रोजगाराभिमुख शिक्षण देणारे नांदेड विद्यापीठ हे देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देवून रोजगाराभिमुख शिक्षण देणारे नांदेड विद्यापीठ हे देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयात २६ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कौशल्य विकास ‘एसईसी’ अभ्यासक्रमावर आधारीत कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृष्णराव पाटील जरोडेकर तर उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. पंडित विद्यासागर यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. विठ्ठल एरंडे, प्राचार्य डॉ. पी.यू. गवई, प्रा. डॉ. कैलास पाटील, प्रा.डॉ. सचिन पवार, प्रा. डॉ. नरेश पिनमकर, प्राचार्य डॉ. निवृत्ती कौसल्ये उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले, जगातील ६६ टक्के विदरान, शास्त्रज्ञ, विचारवंत हे प्रतिकूल परिस्थितींवर मात करून तयार झाले आहेत. संकटाला संधी समजून आपला विकास करण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. ग्रामीण भाग हा आपला मागासलेपणाचा निकष ठरवू नये, कारण गुणवत्तेला जात, धर्म किंवा भौगोलिक क्षेत्राची मर्यादा असू शकत नाही. त्यामुळे न्यूनगंड सोडून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आता विद्यापीठाने कौशल्य विकासाची जोड दिली आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. आता नांदेड विद्यापीठ देशातील विद्यापीठांचे नेतृत्व करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असेही ते म्हणाले अध्यक्षीय समारोप करताना कृष्णराव पाटील जरोडेकर यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक विकास व ग्रामीण भागातील माणसिकता या विषयावर विचार मांडले.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. निवृत्ती कौसल्ये यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या विविध विकासाचा आलेख मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.आर. देशमुख यांनी केले.