शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे धावणार आता विजेवर; एकेरी मार्गाचे ७० किमीचे सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 13:58 IST

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर लवकरच विजेवर रेल्वे धावणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एप्रिलपासून एकेरी मार्गावर विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाला १२ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देनांदेड विभागात रेल्वेचे इंजिन नादुरुस्तीच्या घटनांचे प्रमाणही अधिक आहे. इंजिन नादुरुस्तीनंतर या मार्गावरील रेल्वेची वाहतूक ठप्प होते. गेल्या अनेक वर्षांपासून दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची मागणी आहे.दुहेरीकरणाआधीच एकेरी मार्गावर विजेवर रेल्वे चालविण्यासाठी ‘दमरे’कडून जोरदार तयारी सुरू आहे.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर लवकरच विजेवर रेल्वे धावणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एप्रिलपासून एकेरी मार्गावर विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाला १२ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.

नांदेड विभागात रेल्वेचे इंजिन नादुरुस्तीच्या घटनांचे प्रमाणही अधिक आहे. इंजिन नादुरुस्तीनंतर या मार्गावरील रेल्वेची वाहतूक ठप्प होते. इंजिन दुरुस्त होणे अथवा दुसरे इंजिन येण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे तासन्तास रेल्वे वाहतूक खोळंबते. गेल्या अनेक वर्षांपासून दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची मागणी आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतरच विद्युतीकरण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु दुहेरीकरणाआधीच एकेरी मार्गावर विजेवर रेल्वे चालविण्यासाठी ‘दमरे’कडून जोरदार तयारी सुरू आहे.

नांदेड विभागातील एकेरी रेल्वे मार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम सुरू होणार असून, विद्युतीकरणाच्या कामाने इंजिन नादुरुस्तीच्या घटनांना कायमस्वरूपी आळा बसेल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी डिसेंबरमध्ये औरंगाबाद दौर्‍यात म्हटले होते. त्यानंतर ११ जानेवारी रोजी नांदेड येथे खासदारांची बैठक पार पडली. यावेळी महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनीही विद्युतीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे नमूद केले. या बैठकीच्या दुसर्‍याच दिवशी १२ जानेवारीपासून नांदेड विभागात विद्युतीकरणासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. 

७० कि.मी.चे सर्व्हे पूर्ण या सर्वेक्षणात प्रत्येकी ५ जणांचे ४ पथके काम करीत आहेत. यामध्ये आतापर्यंत मुदखेड ते पूर्णा हे जवळपास ७० कि.मी. अंतराचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कामाचे टेंडर्स काढले जातील. या सर्वेक्षणाच्या आधारे रेल्वे पेगिंग प्लॅन बनविण्यात येईल. तसेच विद्युत पुरवठा करण्यासाठी कंपनीला सबस्टेशन बनविणे, दुरुस्ती डेपो बनविणे यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होईल, असे ‘दमरे’च्या नांदेड विभागातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीNandedनांदेड