शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

नांदेड विभाग मराठवाड्यात दुसरा

By admin | Updated: May 30, 2014 00:32 IST

श्रीनिवास भोसले , नांदेड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने दर महिन्याला आगार आणि विभागाच्या कामाचे गुणांकन केल्या जाते़

श्रीनिवास भोसले , नांदेड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने दर महिन्याला आगार आणि विभागाच्या कामाचे गुणांकन केल्या जाते़ उत्पन्न वाढीत एप्रिल महिन्यामध्ये मराठवाड्यात जालना पहिल्या क्रमांकावर तर नांदेड दुसर्‍या क्रमांकावर आलेला आहे़ महामंडळाच्या वतीने औरंगाबाद प्रदेशातील सर्व विभाग आणि आगाराचे मासिक कार्याचा अहवाल मागविला होता़ यामध्ये विभागाचा खर्च, परकिलोमिटर उत्पन्न, गाडीचा वापर, रद्द किलोमिटर, डिझेलवर झालेला खर्च, नवीन आणि जुन्या टायर्सवरील खर्च, विभागाचे अपघात आणि भारमान आदींना विविध प्रकारे गुण देण्यात येतात़ २०१३ च्या तुलनेत नांदेड विभागाने २०१४ मध्ये प्रगती केली़ २०१३ मध्ये नांदेड विभागाला एप्रिल महिन्यात १२ कोटी ४६ लाख ७७ हजार उत्पन्न मिळाले होते तर २०१४ मध्ये यामध्ये तब्बल १ कोटी ६८ लाख ५७ हजार रूपयांची वाढ झाली असून यावर्षी विभागाला १४ कोटी १५ लाख ३४ हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे़ टक्केवारीनूसार उत्पन्नात १३़५२ टक्के वाढ झाली आहे़ एप्रिल २०१४ च्या उत्पन्नात जालना विभागाने ९५ गुण घेत मराठवाड्यात (औरंगाबाद प्रदेशात) क्रमांक एकचे स्थान प्राप्त केले आहे़ यानंतर नांदेड विभाग ९३़०६, औरंगाबाद- ८८, उस्मानाबाद - ८७, बीड-८३, लातूर - ७२ तर परभणी विभागास ६० गुण मिळाले आहेत़ नांदेड विभागामध्ये सर्वाधिक १०४ गुण मिळवून कंधार आगाराने आपली कामगिरी दाखवून दिली आहे़ कंधारनंतर मुखेड- ९७ आणि माहूर-८६ गुण मिळाले आहेत़ बिलोली आगारास सर्वात कमी ६७ गुण मिळाले आहेत़ मागील वर्षाच्या उद्दिष्टपूर्तीच्या तुलनेत हे गुणांकण केले आहे़ एप्रिल महिन्यात होणार्‍या गर्दीचा फायदा विभागाला मिळाला आहे़ नांदेड विभागाने एप्रिलमध्ये २ लाख १८ हजार किलोमीटरच्या फेर्‍या जादा केल्या़ यामध्ये लग्नसराई, सुट्या आणि यात्रानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेवून नियोजन करण्यात आले होते़ २२ एसटी महामंडळ तोट्यात असल्याची बोंब होत असताना नांदेड विभागाने उत्पन्नवाढीत आपले स्थान गुणवत्ता यादीत टिकवून ठेवण्यात यश मिळविले आहे़ नांदेड विभाग नियंत्रक म्हणून दहा महिन्यापूर्वी रूजू झालेले बाळासाहेब घुले यांच्या एसटीतील अधिकारी, कर्मचारी आणि संघटना पदाधिकारी यांच्याशी असलेल्या समन्वयामुळे उत्पन्नात वाढ होत असल्याचे बोलले जाते़ सर्वांच्या सहकार्यामुळेच यश नांदेड विभागात काही बदल करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले गेले़ यामध्ये विभागातील अधिकारी, कर्मचारी, यांत्रिक कर्मचारी, चालक, वाहक आणि विविध संघटनाच्या पदाधिकार्‍यामुळे सर्व प्रकारच्या गुणांकणामध्ये यश मिळविणे शक्य झाले़ प्रवाशांच्या सोईसाठी असलेल्या एसटीला प्रवाशांनी सहकार्य केल्यात निश्चितपणे महामंडळ नफ्यात येईल, खासगी वाहनांमध्ये प्रवास न करता प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा़ - बाळासाहेब घुले, विभाग नियंत्रक, नांदेड