ुनांदेड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने महिन्याला आगार आणि विभागाच्या कामाचे गुणांकन केले जात आहे़ जून महिन्यातील कामकाजाचा अहवाल नुकताच आला आहे़ यामध्ये मराठवाड्यात नांदेड विभाग अव्वलस्थानी असून विभागास ९०़३५ गुण मिळाले आहेत़ एसटी महामंडळाच्या वतीने राज्यभर गुणांकण पद्धत अंमलात आणली जात आहे़ यामध्ये विभागाचा खर्च तसेच पर किलोमीटर उत्पन्न, गाडीचा वापर, रद्द किलोमीटर, डिझेलवर झालेला खर्च, नवीन आणि जुन्या टायर्सवरील खर्च, विभागाचे अपघात आणि भारमान आदींना विविध प्रकारे गुण दिले जातात़ या सर्व प्रकारामध्ये गुण मिळविण्याच्या स्पर्धेत एसटीचा वेग सुसाट करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे़ २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये नांदेड विभाग प्रगतीपथावर असल्याचे मागील काही महिन्याचे उत्पन्न आणि वाढत्या प्रवासी संख्येवरून स्पष्ट होते़ जूनमध्ये मिळालेल्या गुणांवरून औरंगाबाद प्रदेशातील बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, मुंबईमधील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नागपूर प्रदेशातील भंडारा, गडचिरोली, वर्धा, पुणे प्रदेशातील पुणे, सांगली तर अमरावती प्रदेशातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ विभागाची स्थिती बिकट आहे़ तर नांदेड, मुंबई, नागपूर, अहमदनगर, जळगाव, नाशिक व नाशिक प्रदेशातील सर्वच विभाग चांगल्या स्थितीत आहेत़ प्रदेशनिहाय गुण पुढीलप्रमाणे मिळाले आहेत, औरंगाबाद- ७२़३४, मुंबई- ७४़१३, नागपूर-८०़९९, पुणे-८२़९७, नाशिक-९५़३७, अमरावती प्रदेशास ७३़२५ गुण मिळाले आहेत़ सर्वाधिक ९५़३७ गुण नाशिक विभागास मिळाले आहेत़ नांदेड विभागातील अधिकारी, कर्मचारी, वाहक, चालक आणि सर्व संघटना पदाधिकारी यांच्या प्रयत्नामुळे आणि समन्वयाच्या भूमिकेमुळे नांदेड विभाग गत चार महिन्यांपासून गुणांकण पद्धतीत पहिल्या तीनमध्ये राहत, असल्याची प्रतिक्रिया विभाग नियंत्रक बाळासाहेब घुले यांनी दिली़ (प्रतिनिधी)
मराठवाड्यात नांदेड विभाग अव्वल
By admin | Updated: August 6, 2014 02:18 IST