शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडवर आभाळ फाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:30 IST

महिन्याभराच्या दीर्घ विश्रांतीमुळे बळीराजाचे तोंडचे पाणी पळाले असताना, गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला़ त्यामुळे नांदेड शहर जलमय झाले होते़ नांदेडसह बारा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महिन्याभराच्या दीर्घ विश्रांतीमुळे बळीराजाचे तोंडचे पाणी पळाले असताना, गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला़ त्यामुळे नांदेड शहर जलमय झाले होते़ नांदेडसह बारा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे़यंदाच्या पावसाळ्यात नांदेड जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत सरासरीच्या केवळ ३१९ मि़मी़एवढा पाऊस झाला होता़ त्यात गेल्या महिनाभरापासून उघडीप दिली होती़ मृग नक्षत्र सोडले तर इतर सर्व नक्षत्रांनी निराशाच केली होती़ त्यात हवामान खात्याचे अंदाजही शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम करीत असल्याच्या प्रतिक्रिया येत होत्या़ माघ नक्षत्रामुळे मात्र सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत़ शनिवारी सकाळी अकरा वाजेपासून सुरु झालेला पाऊस सलग बरसत होता़ जवळपास ४० तासामध्ये तीन ते चार तासाचा खंड सोडल्यास पावसाची सलग रिपरिप सुरु होती़ शनिवारी रात्री काही वेळासाठी उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली़ अवघ्या तीन ते चार तासात नांदेडात धो-धो पाऊस बरसला़ त्यामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता़ पहाटेच्या अंधारातच अनेकांना घरात पाणी शिरल्यामुळे जाग आली़दत्तनगर, आनंदनगर, बाबानगर, भाग्यनगर, उदयनगर, हमालपुरा, शिवाजीनगर, गोकुळनगर, स्रेहनगर पोलिस वसाहत, विष्णूनगर, श्रीनगर, भाग्यनगर, मोर चौक, भावसार चौक, अण्णा भाऊ साठे चौक, महावीर चौक, वजिराबाद आदी भागांमध्ये गुडघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी साचले होते़ दत्तनगर, आनंदनगर, बाबानगर, शाहू नगर, गोकुळनगर, हमालपुरा आदी भागात जवळपास ३०० हून अधिक घरात पाणी शिरले होते़ त्यामुळे दिवसभर या घरात चूल पेटली नाही़ नागरीकांना घरातील पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली़ अनेकांनी चिमुकल्यांसह मोजके सामान घेवून नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता़दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकही ठप्प झाली होती़ पाण्यामुळे अनेक दुचाकी, चारचाकी मध्येच बंद पडत होत्या़ रविवारी पहाटेपासून सुरु असलेल्या पावसाने दुपारी तीन वाजेच्या सुमारास तासाभरासाठी विश्रांती घेतली होती़ त्यानंतर पुन्हा भुरभूर सुरु झाली़ रात्री उशिरापर्यंत शहरात रिमझिम पाऊस सुरुच होता़ शहरानजीक वाहणाºया आसना नदीचे पात्रही दुथडी भरुन वाहत होते़ लहान-मोठ्या नाल्यांनाही पूर आला होता़